सामाजिक

“अन्नदान श्रेष्ठदान” ऍड. संदीपकुमार पाखरे यांचा उपक्रम स्तुत्य: सुनील शिंदे रिपब्लिकन सेनेने केले कौतुक, व अभिनंदन ऍड. पाखरे यांनी केला अन्नदानाने वाढदिवस साजरा!

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क: अहिल्यानगर: दि. 8 ऑगस्ट: ज्या समाजात आपण जन्मलो त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो. या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ओळी प्रमाणे ऍड. संदीपकुमार पाखरे यांनी गौतमनगर येथील लहान मुलांना केलेले अन्नदान हे श्रेष्ठ दान असल्याचे मत रिपब्लिकन सेनेचे जिल्हा अध्यक्ष सुनील शिंदे यांनी व्यक्त केले.
ऍड, पाखरे यांचा वाढदिवस अनावश्यक खर्च टाळत अन्नदान करत साजरा करण्यात आला, यावेळी रिपब्लिकन सेनेने त्यांचा शाल, पुष्पगुच्छ देत सत्कार केला, व त्यांनी केलेल्या उपक्रमाचे कौतुक केले.
यावेळी रिपब्लिकन सेनेचे जिल्हा अध्यक्ष सुनील शिंदे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख महेश भोसले, माळीवाडा येथील आंबेडकरी चळवळीचे नेते सुजित घन्गाळे, शिवसेना शिंदे गटाचे विनोद गायकवाड, साईराम सोसायटीचे उपाध्यक्ष दत्तात्रय पारखे, संजय ताकवले आदी उपस्थित होते.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे