ब्रेकिंगराजकिय

जातीयवादी शक्तींना रोखण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सर्व शक्तिनिशी उतरणार : कॉम्रेड सुभाष लांडे

देशस्तंभ ऑनलाईन न्युज नेटवर्क:( पारनेर प्रतिनिधी: दि.25 जुलै)
भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या शताब्दी वर्षपूर्ती कार्यक्रमानिमित्त आयोजित पक्षाच्या पारनेर तालुक्याच्या वतीने चिंतन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
कान्हूर पठार येथील माजी आमदार कॉ. बाबासाहेब ठुबे स्मारकात राज्याचे सेक्रेटरी कॉम्रेड सुभाष लांडे यांनी सांगितले. की,आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जातीयवादी शक्तींना रोखण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष सर्व समविचारी राजकीय पक्षांना सोबत घेऊन निवडणूका लढविणार आहे.
देशात हुकूमशाही व घटना विरोधी चाललेल्या कामकाजांना रोखण्यासाठी सर्व डावे व समविचारी पक्ष संघटीतपणे देशात, राज्यात व प्रत्येक जिल्ह्यात काम करीत आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुका हा क्रांतिकारकांचा तालुका आहे.कान्हूर पठार, पारनेर,वडझीरे,पानोली ही गावे डाव्या विचारसरणीची असल्यामुळे नेहमीच अग्रेसर राहिली आहेत.त्यांचा या शताब्दी वर्षानिमित्त पक्षाला सार्थ अभिमान आहे.
हि चिंतन बैठक कॉ.बबनराव सालके यांचे अध्यक्षतेखाली व कॉ.सुभाष लांडे यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडली.
कॉ. सुधीर टोकेकर,कॉ.संतोष खोडदे, कॉ.रावडे, कॉ.कारभारी अहेर,कॉ. गोकुळमामा काकडे कॉ.एस.एल.ठुबे सर,कॉ.देवदत्त साळवे,कॉ.सुलाबाई आदमाने यांनी पक्षाची ध्येयधोरणे सांगितली. जिल्हा कामगार युनियनचे अध्यक्ष कॉ. सुधीर टोकेकर यांनी जिल्ह्याच्या कामाचा आढावा घेऊन पक्षाची आगामी रणनीती व भूमिका स्पष्ट केली.
या बैठकीत किसान सभेचे तालुका अध्यक्ष कॉ.एस.एल. ठुबे यांनी शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीची संकल्प मांडून फॉर्म भरून घेतले.व जेष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
तसेच या बैठकीस कॉ.जयसिंगराव गायकवाड.कॉ. बाळासाहेब सोनावळे,कॉ.सादीक शेख,कॉ.जी.के.ठुबे,कॉ.बी.ए.भगत,कॉ.संजय भगत,कॉ.बबनराव जोशी,कॉ. सौ.सुनंदा फुलमाळी,कॉ.गोविंदराव ठुबे,कॉ.बापूसाहेब घुमटकर,कॉ. छायाताई ठुबे,कॉ.रखमाबाई शेळके,कॉ.मैनावती दिवेकर,कॉ.चैन्याबापू वाळूंज,कॉ.उमेश उर्फ बाबाशेठ घोडके कॉ.राजमोहम्मद लतीफ इनामदार,कॉ.अमोल एकनाथ ठुबे,कॉ.शौकत इनामदार,कॉ. बापू शंकर ठुबे,कॉ.संदिप ठुबे,(ठाकरे) इ. जूने जाणते मार्गदर्शक व जेष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे