राजकिय

आमदार संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्याला यश ; प्रेमदान हडको येथील नागरिकांच्या सोयीसाठी रेशन धान्य दुकान सुरू केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले जाते : आमदार संग्राम जगताप

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : दि. 22 जुलै: अहिल्यानगर शहरातील महालक्ष्मी उद्यान, ताठे मळा येथील रेशन दुकानदाराच्या त्रासाला कंटाळून प्रेमदान हडको येथील नागरिक अक्षरशा त्रासले होते. तसेच नागरिकांना रेशनचे धान्य आणण्यासाठी सुमारे दीड किलोमीटर अंतर जावे लागत होते ही बाब आमदार संग्राम जगताप यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी तातडीने अन्न धान्य पुरवठा विभागाशी संपर्क साधत पाठपुरावा केला, त्यामुळेच प्रेमदान हडको येथे रेशन धान्य दुकान सुरू झाले असून आमदार संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्याला यश आल्याची माहिती राष्ट्रवादी ओबीसी सेलचे शहर जिल्हाध्यक्ष अमित खामकर व विलास शिंदे यांनी दिली.
प्रेमदान हडको येथे रेशन धान्य दुकान चा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी राष्ट्रवादी ओबीसी सेलचे सेल जिल्हाध्यक्ष अमित खामकर,विलास शिंदे,शिवजित डोके, सचिन जगताप,किरण पिसोरे,किसन गायकवाड, संतोष शिंदे,किरण निकम,शंकर जाधव,प्रसाद डोके,सर्जेराव ठोबरे,ईश्वर भोपळे,नंदकुमार मोरे, आप्पा खताडे,शंकर तुपे,गौरव जाधव,सुनीता वाल्हेकर, अंबिका भिसे,स्वाती पावळे,अल्का शिंदे,सचिन तुपे,संदीप थोरात,गोरख गव्हाणे,पद्माकर गवळी,अनिकेत येमुल, शुभम रासकर, अभिजित ढाकणे,सागर शहाणे, राहुल शहाणे,आकाश साठे,गणेश औटी व समस्त प्रेमदान हडको मधील नागरिक उपस्थित होते.
यावेळी आमदार संग्राम जगताप म्हणाले की, केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना असून त्या नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचे काम केले पाहिजेण. या माध्यमातून लाभार्थ्यांना मदत होईल, प्रेमदान हडको येथील नागरिकांना रेशनचे धान्य आणण्यासाठी दुसऱ्या रेशन धान्य दुकानावर जावे लागत होते. हे अंतर लांब असल्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिलावर्ग यांना त्रासाला सामोरे जावे लागत होते. या भागातील नागरिकांनी प्रेमदान हडको येथेच रेशन धान्य दुकान व्हावे अशी मागणी केल्यानंतर तातडीने महसूल विभागाशी पाठपुरावा करून आज या भागातील नागरिकांना रेशनचे धान्य वाटण्याचे काम झाले आहे.  हा प्रश्न मार्गी लागला असल्यामुळे या भागातील गोरगरीब महिलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मनाला समाधान लाभले असल्याचे ते म्हणाले.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे