ब्रेकिंग

एक वर्ष उलटूनही 12 सोन साखळया चोरणारे अदयापही एमआयडीसी पोलिसांना सापडत नाहीत, गुन्ह्यातील “ते” तपासी अधिकारी व आरोपी शोधण्यासाठी गेलेले ” ते पोलीस कर्मचारी ” यांच्यावर कारवाई करा! रिपब्लिकन सेनेचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना स्मरण पत्र

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क :अहिल्यानगर दि. 18जुलै (प्रतिनिधी)- अहिल्यानगर एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 12 जणांच्या सोन साखळ्या व खिशातील पकिटांवर डल्ला मारणारे चोरटे 1 वर्ष होऊनही मोकाटच फिरत असल्याची माहिती समोर आली आहे. या बाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की 4 जून 2024 रोजी शिर्डी आणि नगर लोकसभा मतदार संघाची मतमोजणी एमआयडीसी येथील वखार महा मंडळाच्या गोडाऊन मध्ये झाली. निवडणूक निकाल ऐकण्यासाठी मतमोजणी केंद्राबाहेर मोठया प्रमाणात गर्दी होती. निवडून आलेल्या उमेदवाराची विजयी मिरवणूक निघाली, या मिरवणूकित मोठी गर्दी होती, याच गर्दीचा फायदा घेत चोरट्यानी 12 जणांच्या सोन्याच्या चेन व खिशातील पैशाची पाकिटे चोरली गेली, ही बाब तक्रारदारांच्या लक्षात आल्यावर तक्रारदारानी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या, व गुन्हा एमआयडी सी पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल आहे. याबाबतीत रिपब्लिकन सेनेने नुकतेच जिल्हा पोलीस अधीक्षक घार्गे यांना तक्रारदार संदीप ठोंबरे यांच्या समवेत स्मरण पत्र दिले, सदर पत्रात या गुन्ह्याचा तपास करणारे ” ते ” तपासी अधिकारी व आरोपीना शोधण्यासाठी गेलेले ” ते ” पोलीस कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाई करत त्यांचे निलंबण करावे, व सदर गुन्ह्याचा तपास एलसीकडे वर्ग करावा म्हटले आहे. याबाबत लवकरात लवकर तपास न लागल्यास तक्रारदरांच्या समवेत मुबंई आजाद मैदान येथे रिपब्लिकन सेनेच्या वतीने उपोषण करून मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री, गृहमंत्री यांना देखील सदर बाबतीत माहिती देणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी तक्रारदार संदीप ठोंबरे, जिल्हा अध्यक्ष सुनील शिंदे, सामाजिक कार्यकर्ते सुनील गट्टानी, संजय ताकवले, विकास रणदिवे, बापू विधाते आदी उपस्थित होते.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे