
अहमदनगर- (प्रतिनिधी) ट्रॅक्टर चोरणारे चोरट्यांना जेरबंद करण्यात श्रीगोंदे पोलिसांना यश मिळाले आहे.
पकडलेल्या चोरांकडून 6 लाखांचा ट्रॅक्टर व ट्रॉली असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
अतुल विश्वनाथ सुद्रिक (वय 26), निलेश मच्छिंद्र सुद्रिक (वय 28), माउली बबन गवारे (वय 19 , सर्व रा. कोपर्डी ता. कर्जत जि.अ.नगर) असे पकडण्यात असलेल्यांची नावे आहेत.
जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोनि रामराव ढिकले यांच्या सूचनेनुसार सपोनि दिलीप तेजनकर, सफौ अंकुश ढवळे, पोना गोकुळ इंगवले, पोकॉ प्रकाश मांडगे, पोकॉ किरण बोराडे, पोकॉ दादासाहेब टाके, पोकॉ अमोल कोतकर, पोकॉ प्रशांत राठोड आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
याबाबतची माहिती अशी झुंबर हरी कोंथिबीरे (रा.साळवणदेवी रोड,श्रीगोंदा) त्यांच्या मालकीचा स्वराज कंपनीची ट्रक्टर ट्रॉलीसह घरासमोरुन कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेला . त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गु.रजि. नं. 44 /2022 भा.द.वि.क.379 प्रमाणे दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास चालू असताना दि. 7 फेब्रुवारी 2022 रोजी श्रीगोंदा पोलीस ठाणेचे पोनि रामराव ढिकले यांना माहिती मिळालेल्या माहीतीवरुन त्यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांना सूचना दिल्या. पोलिस पथक रवाना झाले, यानंतर अतुल विश्वनाथ सुद्रिक, निलेश मच्छिंद्र सुद्रिक, माउली बबन गवारे (सर्व रा. कोपर्डी ता. कर्जत) यांनी केल्याबाबत माहीती मिळाली. त्यावरुन गुन्हे प्रकटीकरण पथकाने आरोपींना कोपर्डी येथून ताब्यात घेतले.
त्यांना अधिक विश्वासात घेऊन विचारपूस केली. या दरम्यान गुन्हाची कबुली देऊन चोरी केलेला 6 लाख रुपये किंमतीचा स्वराज ट्रॅक्टर व ट्रॉली असे कोपर्डी कर्जत येथून हस्तगत करण्यात आला आहे.
ट्रक्टर चोरीच्या टोळीचा मुख्य सुत्रधार अतुल विश्वनाथ सुद्रीक याचेविरुध्द कर्जत पोलीस ठाण्यात गु.रजि.नं. 313 /2018 भा.द.वि.क.302 प्रमाणे दाखल आहे. आरोपी पोलीस कस्टडीमध्ये असून त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक गोकुळ इंगावले हे करीत आहेत.