देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क: अहिल्यानगर, दि. 28 खर्डा (ता.जामखेड) येथे संत एकनाथ महाराज व संत वामनभाऊ महाराज यांच्या पायी दिंडीचे सोहळ्यांचे जामखेड येथे भक्तिभावाने स्वागत करण्यात आले. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी दोन्ही पालख्यांचे दर्शन घेतले व सोहळ्यात सहभागी होत भाविकांमध्ये उत्साह निर्माण केला.
संत एकनाथ महाराज पालखी खर्डा येथे मुक्कामी होती. सकाळी पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवण्यापूर्वी प्रा. शिंदे यांनी पादुकांचे दर्शन घेतले. खर्डा ही संत एकनाथ महाराज यांच्या पालखी मार्गातील महत्त्वाची व भक्तिभावाने नटलेली भूमी असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
तसेच, श्री क्षेत्र गहिनीनाथ गड, चिंचोली (नाथ), जि. बीड येथून पंढरपूरकडे मार्गस्थ झालेल्या संत वामनभाऊ महाराज पायी दिंडीचेही जामखेड येथे स्वागत करण्यात आले. महंत ह.भ.प. विठ्ठल महाराज यांचे प्राथमिक स्वरूपात सत्कार करून त्यांच्या अध्यात्मिक सेवेस कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
वारकऱ्यांच्या सोयीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने रेनकोट वाटप उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमात प्रा. शिंदे यांच्या हस्ते अनेक वारकऱ्यांना रेनकोट देण्यात आले. वारीच्या मार्गावरील अशा उपक्रमांची उपयुक्तता अधोरेखित करत त्यांनी संघटनेचे आभार मानले.
पालखीचे स्वागत पालखी चालक ह.भ.प. रघुनाथबुवा व योगेश महाराज (गोसावी) यांचाही सत्कार करून करण्यात आले.
कार्यक्रमास प्रा. मधुकर राळेभात, रवींद्र सुरवसे, संजीवनी पाटील, शरद कार्ले, संजय गोपाळघरे, भागवत सुरवसे, महेश दिंडोरे, राजू मोरे, महालिंग कोरे, गणेश शिंदे, प्रशांत कांबळे, आकाश खेडकर, सोनु सुरवसे, भगवान मुरूमकर, संजय काशीद, बापूराव ढवळे, गणेश जगताप, राहुल बेदमुथा, अमित चिंतामणी, प्रवीण सानप, तात्याराम पोकळे, अण्णासाहेब ढवळे, पोपट राळेभात, सोमनाथ राळेभात, मोहन पवार, महारुद्र महारणवर, विठ्ठल राळेभात, विक्रम घायतडक, उद्धव हुलगुंडे, दिगंबर चव्हाण, सुरज काळे, गोरख घनवट यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक व ग्रामस्थ सहभागी झाले.
वारी परंपरेतील नितांत श्रद्धा, भक्तीभाव व शिस्तबद्धतेचे दर्शन घडविणाऱ्या या पायी दिंडीमुळे संपूर्ण खर्डा व जामखेड परिसर भक्तिमय वातावरणात न्हालून निघाला होता.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा