देवळाली प्रवरा, येथील गांजा बाळगणारा आरोपी जेरबंद! विक्रीसाठी आणलेला मुद्देमाला जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई!

अहमदनगर दि. 22 मार्च (प्रतिनिधी )
प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना अहमदनगर जिल्ह्यातील अवैध धंद्याची माहिती काढुन त्यांचेविरुध्द कारवाई करणेबाबत आदेशित केले होते.
नमुद आदेशान्वये पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोउपनि/तुषार धाकराव, रविंद्र कर्डीले, गणेश भिंगारदे, देवेंद्र शेलार, संतोष खैरे, विजय ठोंबरे, रणजीत जाधव, किशोर शिरसाठ, अरुण मोरे, अर्जुन बडे व महिला अंमलदार भाग्यश्री भिटे अशांचे पथक नेमूण जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती काढुन कारवाई करणेबाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले.
पथक राहुरी पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्दे करणा-या इसमांची माहिती काढत असतांना पोउपनि/धाकराव यांना दिनांक 21/03/24 रोजी गुप्त बातमीदारामार्फत इसम नामे वैभव गायकवाड रा. वडारवाडी, देवळाली प्रवरा, ता. राहुरी याने एक गावठीकट्टा विक्री करण्याचे उद्देशाने आणलेला असुन तो आज रोजी सदर गावठीकट्टा कोणाला तरी विक्री करणार आहे. आता गेल्यास तो गावठीकट्टयासह त्याचे राहते घरी मिळुन येईल अशी बातमी मिळाली. त्यानंतर पथकाने तात्काळ राहुरी पोलीस स्टेशन येथे जावुन राहुरी पो.स्टे.चे पोनि/संजय ठेंगे, पोउनि/समाधान फडोळ व स्टाफ तसेच पंच, साधने सोबत घेवुन छाप्याचे नियोजन केले.
पथकाने लागलीच बातमीतील नमुद ठिकाणी वडारवाडी, देवळाली प्रवरा, ता. राहुरी येथे जावुन संशयीत नामे वैभव गायकवाड याचे वास्तव्याबाबत माहिती घेवुन, त्याचे राहते घरा जवळ जावुन खात्री करता, घराच्या बाहेर बातमीतील वर्णना प्रमाणे एक संशयीत इसम उभा असलेला दिसला. त्यास पोलीस पथकाची ओळख सांगुन त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव वैभव सुनिल गायकवाड वय 27, रा. वडारवाडी, देवळाली प्रवरा, ता. राहुरी असे असल्याचे सांगितले. त्याची व त्याचे राहते घराची झडती घेता त्याचे कब्जात गावठी कट्टा मिळुन आला नाही. त्यामुळे संशयीत वैभव गायकवाड याचेकडे गावठी कट्टयाबाबत विचारपुस करता त्याने मी गावठी कट्टा विक्री करत नाही असे सांगितल्याने पथकाचा संशय बळावला. पथकाने लागलीच संशयीताचे घराची झडती घेता घरातील दिवाणचे कप्यात एका गोणीत ओलसर गांजा, बिया बोंड, काड्या व पाने संलग्न असलेल्या कॅर्नोबस या वनस्पतीचे शेंडे असे मिळुन आल्याने आरोपी नामे 1) वैभव सुनिल गायकवाड वय 27, वडारवाडी, देवळाली प्रवरा, ता. राहुरी यास ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या आरोपीचे कब्जातुन 58,250/- रुपये किंमतीचा गोणीतील 5 किलो 820 ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ गांजा मिळुन आल्याने आरोपी विरुध्द पोहेकॉ/1293 गणेश प्रभाकर भिंगारदे नेम स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन राहुरी पोलीस स्टेशन गु.र.नं. 300/2024 गुंगीकारक औषधिद्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ कायदा सन 1985 चे कलम 8 (ग), 20 (ब) ii (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्ह्याचा पुढील तपास राहुरी पोलीस स्टेशन हे करीत आहे.
सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला सो. पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्री. वैभव कलुबर्मे साहेब, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर, मा.डॉ.श्री. बसवराज शिवपुजे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.