नगर दि. 4 मार्च (प्रतिनिधी )-पद्माशाली समाजातील युवक श्रीनिवास सब्बन याने महाराष्ट्र शासनाची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन त्याची नुकतेच महाराष्ट्र शासनाच्या औद्योगिक आणि आरोग्य विभागाच्या सहाय्यक संचालक पदी निवड झाल्याबद्दल बोज्जा परिवाराकडून मा. नगरसेविका सौ. वीणा बोज्जा यांचे हस्ते सन्मान करण्यात आला या वेळी गणेश सब्बन, सौ. पद्मिनी सब्बन, सौ. इंदुमती सब्बन, चंद्रकांत बोज्जा, अशोक बोज्जा, सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा, विजय बोज्जा, मनोज बोज्जा, सौ. शकुंतला बोज्जा,सौ. लता बोज्जा, सौ. सुरेखा बोज्जा, सौ. सुवर्णा बोज्जा, सौ. राणी बोज्जा व सौ. वृषाली बोज्जा आदी उपस्थित होते.
या वेळी बोलतांना सौ.बोज्जा म्हणाले श्रीनिवास याची निवड ही संपूर्ण पद्माशाली समाजासाठी अभिमानाची गोष्ट आहे. अत्यंत गरीब कुटुंबातून काम करून शिकून अभ्यास केला म्हणून त्याला हे पद मिळाले, या पदाचा उपयोग समाजासाठी करावा असे आव्हान केले.
या वेळी सत्कारास उत्तर देतांना श्रीनिवास सब्बन म्हणाले मी अत्यंत गरीब कुटुंबातून वर आलो असल्यामुळे मला या पदाची जाणीव आहे, या पदाचा उपयोग मी नक्कीच समाजासाठी व देशासाठी करेल असे आश्वासन दिले. या वेळी सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा यांनी श्रीनिवास यांस पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्यात.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा