मनपाचे सर्व कर भरूनही नागरिक सुविधे पासून वंचित रेल्वे स्टेशन रेल्वे कॉटरच्या मागील वस्ती मधील नागरिकांचा जिल्हाधिकारी व महानगरपालिका कार्यालय समोर निदर्शने करून ठिय्या आंदोलन!

अहमदनगर (प्रतिनिधी)- रेल्वे स्टेशन रेल्वे कॉटरच्या मागील वस्ती मधील सदर जागा ही मौजे चाहूराणा बू. येथील सर्वे नंबर 124 ही जागा महाराष्ट्र शासनाची असून या जागेवर 25 ते 30 वर्षापासून राहात आहे. तसेच शेजारील सर्वे नंबर 50/51 ही जागा महार वतनाची असुन सदर वस्तीमध्ये मूलभूत सुविधा नसल्यामुळे वयोवृद्ध, गरोदर स्त्रिया, शाळेत जाणारी मुले व मुली यांना मोठ्या प्रमाणावर त्रासाला सामोरे जावे लागत असल्याच्या निषेधार्थ समस्त नागरिकांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय व अहमदनगर महानगरपालिका येथे निदर्शन करून ठिय्या आंदोलन करण्यात आले यावेळी रोहित (बंडू) आव्हाड, संजय कांबळे, शारदा पारेख, नंदा साळवे, लिंबाजी जाधव, सोनवणे काका, नजमा पठाण, कमल नन्नवरे, भारती जगधने, मच्छिंद्र गायकवाड, विकास वाघ, शामराव भालेराव, रियाज शेख, शोभा सरोदे, पुनम बुरुडे, सुरेखा आजबे, वैशाली पारखे, मोहिते धीवर, आम्रपाली लांडगे, अलका यादव, विजया खराडे, अर्चना इजगज, रेखा गायकवाड, बेबी भास्कर, रेश्मा बेग, रेखा सूर्यवंशी, वंदना गायकवाड, सुमन शिंदे, कमल इंगळे, जया खंडागळे, योगेश कोंडा, रूपाली जगताप, शोभा गायकवाड, सचिन धावरे, सुजाता दुशिंग, सुमय्या शेख, शेहनाज सय्यद आदीसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच निवेदनात म्हटले आहे की अंत्यविधीला देखिल जाण्यासाठी रस्ता नाही या व अशा अनेक समस्यांमुळे नागरिक हैराण झाले असून जगणे नरकागत झालेले आहे. तरी सर्व नागरिकांच्या वतीने नियमाप्रमाणे पालिकेचा कर भरत असून देखील आम्हाला मूलभूत सुविधा मिळत नाही. ही शोकांकिता आहे. महापालिकेचे संबंधित अधिकारी यांना वेळोवेळी सूचित केलेले आहे. व निवेदनही दिलेले असून संबंधितांकडून आमच्या वस्तीकडे आज पावतो दुर्लक्षच केलेला आहे. तरी सदरील वस्तीमधील नागरी सुविधा व नागरिकांचे हक्क मिळण्यासाठी ज्या ठिकाणी राहत आहे त्या ठिकाणी दलित वस्ती म्हणून घोषित करण्यात यावी तसेच सदरील जागेचे माता रमाई आंबेडकर नगर असे नामकरण करण्यात यावे व सदर जागेमध्ये राहणाऱ्या रहिवाशांच्या सोयी सुविधा साठी व दळणवळणासाठी रस्ता व सांडपाण्यासाठी ड्रेनेज लाईन करून द्यावे तसेच व सर्वे नं. 50/51 मधून जो डीपी रोड गायके मळा ते बोथरा कंपनी पर्यंत जाणारा तो रस्ता नागरिकांसाठी दळणवळणासाठी खुला करण्यात यावा तसेच सदर वस्तीमध्ये शासनाचे अधिकारी यांनी प्रत्यक्षात येऊन सर्वे करावा जेणेकरून आमच्या समस्या त्यांना कळतील व आमच्यावर होणारा अन्याय हा लक्षात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. व आम्हाला न्याय मिळवून द्यावा अन्यथा समस्त नागरिकांच्या वतीने 15 दिवसानंतर रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.