35,000/- रूपये किमतीच्या 3 इलेक्ट्रिक मोटार 3 आरोपीकडून जप्त संघटितपणे मोटर पंप चोरी करणारी तिसरी टोळी राहुरी पोलिसांकडून जेरबंद!

राहुरी दि. 9 ऑगस्ट (प्रतिनिधी )
राहुरी पोलीस स्टेशन हद्दीतून दिनांक 2 जुलै ते 3 जुलै 2024 दरम्यान फिर्यादी श्याम शरद शिंदे वय 30वर्ष धंदा शेती राहणार जातप.तालुका राहुरी यांचे जातप शिवारातील विहिरीमध्ये असलेली पाच हजार रुपये किंमतीची पाच हॉर्स पावरची पाणबुडी इलेक्ट्रिक मोटर अज्ञात इसमाने चोरून नेल्याबाबत भारतीय न्याय संहीता कलम 303 (2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
सदर गुन्ह्याच्या तपासा दरम्यान पोलीस निरीक्षक संजय ठेंगे राहुरी पोलीस स्टेशन यांना जाताप गावातील नागरिकां मार्फत माहिती मिळाली की सदरची चोरी ही इसम नामे 1) कैलास शामराव सोनवणे वय 25 वर्ष.2) देविदास रोहिदास मोरे वय 27 वर्ष.3) अविनाश विश्वनाथ पवार वय 30 वर्ष सर्व राहणार कान्हेगाव तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर यांनी केली असल्याची माहिती मिळाली वरून सदर आरोपीस दिनांक 04/08/2024 रोजी अटक करून आरोपी मजकूर यांनी संघटित होऊन गुन्हा केल्याने संघटित सदर गुन्ह्यास भारतीय न्याय संहिता कलम 112 (2) हे कलम वाढवून मान्य न्यायालयापुढे हजर करून 5 दिवस पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आली. पोलीस कस्टडी रिमांड घेण्यासाठी सरकारी अभियोक्ता श्री रवींद्र गागरे यांनी पोलिसातर्फे बाजू मांडली. पोलीस कस्टडी दरम्यान चोरलेल्या इलेक्ट्रिक पाण्याच्या 3 मोटारी आरोपीने बंधाऱ्या लगतचे ओढ्यातून काढून दिल्याने ते भारतीय साक्षाधिनियम 23(2) अन्वये तपासी अधिकारी सहाय्यक फौजदार श्री विष्णू आहेर यांनी जप्त करून एकूण ३५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. फिर्यादीचे मोटारीचा तपास सुरू आहे.
सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला साहेब, मा अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलुबरमे साहेब, मा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बसवराज शिवपुजे साहेब यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील, सहायक फौजदार श्री विष्णू आहेर, तपास पथकातील पोलीस हेडकॉन्स्टेबल विकास साळवे,सुरज गायकवाड, राहुल यादव,संदीप ठानगे, पोलीस नाईक प्रवीण बागुल, पोलीस शिपाई प्रमोद ढाकणे, सचिन ताजणे, नदीम शेख , अंकुश भोसले, सतीश कुऱ्हाडे यांनी केली.