आरोग्य व शिक्षण

प्रा.डॉ. अनंत केदारे यांना महाराष्ट्र शासनाचा ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे’ राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

राहुरी / प्रतिनिधी — पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या तालुक्यातील सात्रळ येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. अनंत नानाजी केदारे यांच्या पुणे येथील सुगावा प्रकाशन यांनी प्रकाशित केलेल्या ‘वाग्दान’ काव्यसंग्रहास महाराष्ट्र शासनाचा स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार अंतर्गत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे. एक लाख रुपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
प्रा. डॉ. अनंत केदारे यांच्या यशाबद्दल सात्रळ महाविद्यालयानेही त्यांचा यथोचित सन्मान केला आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड्.मय पुरस्कार योजनेअंतर्गत सन २०२० चे राज्य पुरस्कार शासनाकडून जाहीर करण्यात आले आहेत. शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या सन २०२० च्या राज्य वाड्.मय पुरस्कारांमध्ये प्रौढ विभागातील उपेक्षितांचे साहित्य ( वंचित, शोषित, पीडित, आदिवासी, कष्टकरी, अनुसूचित जाती व नवबौद्ध इत्यादी) या वाड्.मय प्रकारासाठी दिला जाणारा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार डॉ. केदारे यांना जाहीर झालेला आहे. सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य प्रोफेसर डाॅ. सोमनाथ घोलप होते. यावेळी उपप्राचार्य व हिंदी विभागप्रमुख प्रा. डॉ. भाऊसाहेब नवले, ज्येष्ठ प्रोफेसर डॉ. शिवाजी पंडित तसेच सहकारी प्राध्यापक उपस्थित होते.
डॉ. केदारे यांचे ‘व्यवहारोपयोगी एवं कामकाजी हिंदी’, ‘संसद से सडक तक और गोलपिठा’,’तुलनात्मक अध्ययन’, ‘प्रसाद और तांबे का काव्य’ इत्यादी ग्रंथ प्रसिद्ध आहेत.
त्यांनी पुणे विद्यापीठाचे दोन व युजीसी, नवी दिल्लीचा एक लघु संशोधन प्रकल्प पूर्ण केले असून त्यांचे ४३ संशोधनपर लेख विविध राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय स्तरावरील नियतकालिकातून प्रसिद्ध आहेत. ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे खा. डॉ. सुजय विखे संस्थेचे विश्वस्त अण्णासाहेब म्हस्के, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, सहसचिव भारत घोगरे, सात्रळ महाविद्यालय विकास समितीचे पदाधिकारी, महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या डॉ. जयश्री सिनगर, प्रोफेसर डाॅ. सोमनाथ घोलप, उपप्राचार्य प्रा. दीपक घोलप, प्रा. दिनकर घाणे, डॉ. भाऊसाहेब नवले यांनी त्यांचे अभिनंदन केले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे