देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क अहिल्यानगर दि. 16 नोव्हेंबर (प्रतिनिधी ) अहिल्यानगर नगर शहर विधानसभा मतदार संघांचे महायुतीचे अजित पवार गटाचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ नगर कल्याण रोडवरील साईराम सामाजिक सोसायटी येथे राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष सुरेश बनसोडे व साईराम सोसायटीचे अध्यक्ष सुनील शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक घेण्यात आली.
यावेळी अध्यक्षीय भाषणात डॉ. शशीकांत फाटके म्हणाले, साईराम सोसायटीच्या जागेच्या उतार्यांचा प्रश्न त्याचप्रमाणे या परिसरातील विविध समस्या सुरेश बनसोडे, सुनील शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून सोडविल्या जातील. आमदार संग्राम जगताप यांना बहुमताने निवडून विकास कामाची पुन्हा संधी दयावी असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी बोलतांना सुरेशभाऊ बनसोडे म्हणाले आमदार संग्राम जगताप यांनी नगर शहरात अनेक विकास कामे केली आहेत. म्हणूनच त्यांच्या विकास संवाद यात्रेला नगरकर मोठा प्रतिसाद देत आहेत. त्यांनी महिलांसाठी होम मिस्टर, रांगोळी स्पर्धा राबवून महिलांना प्राधान्य देण्याचे काम केले आहे. येणाऱ्या 20 तारखेला अनु. क्रमांक 4 व घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करावे. अशी विंनती यावेळी केली.
यावेळी साईराम सोसायटीचे अध्यक्ष, फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ नेते सुनील शिंदे बोलतांना म्हणाले, साईराम सोसायटीमध्ये डांबरी रस्ता झालेला आहे, पण तो कधी खराब होईल सांगता येत नाही त्यामुळे आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून सिमेंटचा रस्ता व्हावा, तसेच या भागातील अत्यन्त महत्वाचा प्रश्न म्हणजे या भागातील नागरिकांचे आजही घराच्या, जागेच्या उताऱ्यावर स्वतःचे नाव येत नाही या प्रश्नाकडे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष सुरेशभाऊ बनसोडे यांच्या माध्यमातून आमदार संग्राम जगताप यांनी लक्ष घालावे अशी विनंती मनोगतातून व्यक्त केली. यावेळी त्यांनी साईराम सोसायटीच्या वतींत आमदार संग्राम जगताप यांना जाहीर पाठिंबा देत तसे पत्र दिले. यावेळी त्यांनी साईराम सोसायटीतून आमदार जगताप यांना जास्तीत जास्त मताधिक्क्य मिळवून देऊ असा निर्धार व्यक्त केला.
यावेळी या भागातील प्रथमच मतदानाचा हक्क बजाविणार आहे, असा युवक भारत श्रीराम याच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला.यावेळी आमदार संग्राम जगताप यांच्या भगिनीं वंदना फाटके (जगताप ), रविकांत दंडी, सुजित घंगाळे, आरपीआय आठवले गटाचे अमित काळे, नाना पाटोळे, मनोज सैंधर, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हा अध्यक्ष सुमेध गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते संजय ताकवले, निलेश ठोंबरे, विकास रणदिवे, विजयराव वडागळे, बाप्पू विधाते, गौतम कांबळे, महेश भिंगारदिवे, राऊतमामा, बालाजी श्रीराम, सोमनाथ बोऱ्हाडे, श्रीपाद वाघमारे, अतुल मिसाळ, राजू पंचमुख, नागेश वाव्हळ, दत्ता पारखे, योगेश सकटकर, शंकर बोरुडे, दिनेश शिंदे, आदी कार्यकर्ते व परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा