अहिल्यानगर दि. 4 नोव्हेंबर (प्रतिनिधी ) अहिल्यानगर नगर शहर विधानसभा मतदार संघांचे महायुती अजित पवार गटाचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या नगर विकास संवाद यात्रेला नगरकर भरभरून प्रतिसाद देत आहेत. प्रत्येक प्रभागात त्याचे स्वागत व सत्कार करण्यात येत आहेत. आज शहरातील कायनेटीक चौक भागातील रेल्वे पुलाजवळील सुखकर्ता कॉलनी, प्रियांका कॉलनी, लक्ष्मी सोसायटी, आदी भागत प्रचार करत नागरिकांशी संवाद साधला यावेळी या भागातील आरपीआय (आठवले ) गटाचे नेते नाना पाटोळे यांच्या घरी आमदार संग्राम जगताप यांनी भेट दिली असता, त्यांचा संविधान देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक विजय गव्हाळे, दत्ताशेठ खैरे पदाधिकारी, कार्यकर्ते त्याचप्रमाणे परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा