अहिल्यानगर दि. 30 ऑक्टोबर (प्रतिनिधी ) अहिल्यनगर महायुतीचे नगर शहर विधानसभा मतदार संघांचे महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी काल सायंकाळी नगर कल्याण रस्त्यावरील शिवाजीनगर परिसरात नगर विकास यात्रा काढत त्यांनी येथील नागरिकांशी संवाद साधला.
आदर्शनगर परिसरातील गणपती मंदिरा चौकापासून त्यांनी यात्रेला सुरुवात केली, आदर्श नगर, शिवाजी नगर,साईराम सोसायटी, भावना ऋषी सोसायटी, बालाजीनगर, श्रीकृष्ण नगर परिसरात नगर विकास यात्रा काढली यावेळी त्यांचे चौका चौकात महिलांनी औक्षण करून स्वागत केले. यावेळी यावेळी परिसरातील नागरिकांनी आमदार संग्राम जगताप विकास कामाच्या जोरावर भरघोस मतांनी निवडून येतील आशा भावना व्यक्त केल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा