राजकिय

काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आग्रहानंतर किरण काळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल ; विरोधकांनी किरण काळे नावाचा नाम साधर्म्य असणारा फॉर्म भरत केली खेळी

अहिल्यानगर दि. 29 ऑक्टोबर (प्रतिनिधी) : सकाळपासून काँग्रेसच्या वर्तुळामध्ये मोठी खलबते झाली आहेत. सोमवारी दिवसभर देखील बैठकांचा सिलसिला सुरू होता. मात्र मंगळवार सकाळ पासून काळे यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी एकत्र होत काळे यांना फॉर्म भरण्यासाठी प्रचंड आग्रह धरला. कोणत्या ही परिस्थितीत माघार घ्यायची नाही. ही जागा राष्ट्रवादीने काँग्रेसला सोडावी. अन्यथा आपण बंडखोरी करत उमेदवारी करावी, असा आग्रह यावेळी कार्यकर्त्यांनी धरला. कार्यकर्त्यांनी अक्षरशः काळे यांना घरा बाहेर करत फॉर्म भरायला चला म्हणत तहसील कार्यालयामध्ये फॉर्म दाखल करण्यासाठी नेले. काळे यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहा नंतर नाईलाजास्तव अखेर फॉर्म भरला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी मधून काँग्रेसची बंडखोरी पुढे आली आहे. काळे यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि अपक्ष असे दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. युवा सेनेचे राज्य सचिव विक्रमभैय्या राठोड हे देखील समवेत उपस्थित होते.
काळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल होण्यापूर्वीच किरण काळे यांच्या नावाशी साधर्म्य असणारा जामखेड येथील एका व्यक्तीचा किरण नामदेव काळे या नावाने विरोधकांनी निवडणूक अर्ज दाखल केला आहे. याबाबत ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा यांनी म्हटले आहे की, विरोधकांना माहिती आहे की काळे हे सक्षम विरोधक आहेत. त्यामुळे किरण काळे असं पूर्ण नाव असणाराच उमेदवार त्यांनी जामखेड वरून आयात केला आहे. कारण त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.
आजपर्यंत ज्या पद्धतीने किरण काळे यांनी शहरातल्या ताबेमारी, दहशत, गुंडाराज याला तीव्र विरोध करत शहरामध्ये काँग्रेसला सक्षम विरोधी पक्ष म्हणून उभं करत नागरिकांच्या प्रश्नांवर, विकासाच्या मुद्द्यावर तीव्र स्वरूपाचा आवाज उठवला आहे. यामुळे जन माणसांमध्ये काळे यांच्या उमेदवारीची मोठी मागणी आहे. त्यामुळे काँग्रेसच्या जागा मिळत नसेल तर बंडखोरी झालीच पाहिजे. महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी फेरविचार करावा आणि ही जागा काँग्रेसला द्यावी, अशी मागणी माथाडी काँग्रेस जिल्हाध्यक्ष विलास उबाळे यांनी केली आहे.
यावेळी अल्पसंख्यांक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला, मागासवर्गीय काँग्रेस विभागाचे प्रदेश सरचिटणीस सुनील क्षेत्रे, सावेडी उपनगर विभागाचे अध्यक्ष अभिनय गायकवाड, शहर जिल्हा सचिव किशोर कोतकर, महिला काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्ष उषाताई भगत, महिला उपाध्यक्ष शैलाताई लांडे, काँग्रेसच्या महिला ज्येष्ठ नेत्या जरीना पठाण, महिला ज्येष्ठ नेत्या तथा उपाध्यक्ष डॉ. जाहिदा शेख, अल्पसंख्यांक विभाग शहराध्यक्ष चंद्रकांत उजागरे, युवक काँग्रेस उपाध्यक्ष विकास भिंगारदिवे, क्रीडा व युवक काँग्रेस विभाग शहर जिल्हाध्यक्ष आकाश आल्हाट, कामगार आघाडीचे दीपक काकडे, शहर जिल्हा सचिव रोहिदास भालेराव, संपतराव बोरुडे, उमेशराव साठे, काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष इंजि. सुजित क्षेत्रे, युवक सामाजिक न्याय विभाग शहर जिल्हाध्यक्ष गौरव घोरपडे, शहर जिल्हा सचिव शंकर आव्हाड, खलिमा शेख, दिव्यांग विभागाच्या शहर जिल्हाध्यक्ष मिनाज सय्यद,
देवराम शिंदे, पोपटराव लोंढे, जयराम आखाडे, बाबासाहेब वैरागर ,बाबासाहेब वैरागर, नानासाहेब दळवी, राजेंद्र तरटे आदींसह काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी, माथाडी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे