अहिल्या नगर दि. 27 ऑक्टोबर (प्रतिनिधी )
विधानसभेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा आणि महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर संध्याकाळीच महायुतीच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन नगर विकासयात्रेचा शुभारंभ केला.
नगरची प्रगती कशी वेगाने होत आहे, काय कामे केली, येत्या पाच वर्षांत काय करायचं नियोजन आहे, हे सांगण्यासाठीच ही विकासयात्रा आहे.
मार्केट यार्डमधील महात्मा फुले चौकापासून (प्रभाग क्रमांक १४) संध्याकाळी विकासयात्रेचा श्रीगणेशा झाला. उत्साही कार्यकर्ते, स्वागतासाठी उत्सुक नागरिक मोठ्या संख्येनं असल्याचं पाहून भारावूनच गेलो. सर्वसामान्यांचं हे प्रेम, त्यांच्या अपेक्षा आणि पाठिंबाच नगरच्या विकासासाठी काम करण्याला बळ देतंय.
विकासयात्रेत चौकाचौकांमध्ये माता-भगिनींनी औक्षण करून शुभशकुनाचा संकेत दिला. दर्शन घेताना वडीलधाऱ्या माणसांनी ‘यशस्वी भव’ असा आशीर्वाद दिला. पुष्पगुच्छ देत, हार घालत नागरिक स्वागत करत होते.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा