पद्माशाली समाजाने प्री वेडींग वर बंदी आणावी:सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा

अहमदनगर दि.११ मे (प्रतिनिधी) – सध्या सर्वच समाजामध्ये प्री वेडिंग चे भूत डोक्यात घुसले असून त्याचे दुष्परिणाम फार मोठया प्रमाणात दिसून येत आहेत यासाठी जसे मारवाडी समाजाने बंदी घातली त्या प्रमाणे पद्मशाली समाजानेही बंदी घालावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा यांनी एका पत्रकानव्ये संपूर्ण समाजाला आवाहन केले आहे.
नुकतेच नगर, पुणे, सोलापूर, बुलढाणा या ठिकाणी प्री वेडींग केल्यामुळे लग्न तुटल्याचे निदर्शनास आली. तर काही ठिकाणी मुलाने मुलीचा गैरफायदा घेऊन अनैतिक संबंध ठेवले असल्याचे निदर्शनास आले आहे. सदर बाब ही अत्यंत गंभीर असून याचा परिणाम संपूर्ण समाजावर झाल्याशिवाय राहणार नाही. अशा घटनेमुळे अनेक वधू मुली घाबरल्याचेही निदर्शनास आले आहे.
काही वर मुले हे मोठया प्रमाणात प्री वेडींग चा गैरफायदा घेत असल्याचे निदर्शनास आले आहे.
वास्तविक पाहता आपल्या संस्कृतीत वधू वर नेहमी लग्नानंतरच एकांतात असणे व फिरायला जाणे योग्य माणलेय ते यासाठीच की हिंदू पध्द्तीत्त विवाहसंस्थेची गरीमा सांभाळली जावी. पारंपरिक पध्द्तीने व सुससंस्कृत आचार विचारांनी लग्ना सारख्या पवित्र बंधना ला पार पाडणे ही पुन्हा काळाजी गरज झाली आहे.
*फोटोग्राफी असोसिएशन ने निर्णय घ्यावा*
वरील घटना घडू नये व चुकीच्या गोष्टीला मदत न करता विरोध करावा व आपला व्यवसाय न पाहता एक सामाजिक बांधिलकी या नात्याने फोटोग्राफी असोसिएशनेही प्री वेडींग करू नये असे त्यांचे व्यापारी बंधूना आवाहन करावे अशीही मागणी श्रीनिवास बोज्जा यांनी केली आहे.