कर्जत तालुक्यातील सर्व सामाजिक संघटनेच्या माध्यमातून गेल्या चार वर्षापासून कर्जत शहर व परिसरात स्वच्छता, सौंदर्याकरण, वृक्षारोपण, वृक्षसंवर्धनाची कामे स्वयंफूर्तीने,श्रमदानातून व लोकसहभागातून केली जात आहेत. वृक्षलागवडीच्या मोहिमेला १४६० पूर्ण झाल्याबद्दल दादा पाटील महाविद्यालय कर्जत येथील शारदाबाई पवार सभागृहामध्ये कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
भोसे गावातील श्री संत बाळूमामा मेंढी माऊली प्रतिष्ठान सर्व सामाजिक संघटनेकडून अविरतपणे वृक्षारोपणाचा जो उपक्रम राबविला जातो त्याची प्रेरणा आणि मार्गदर्शन घेऊन गेल्या तीन वर्षापासून मंदिर परिसरामध्ये वेगवेगळया झाडांचे वृक्षरोपण तसेच संवर्धन करण्याचे काम करत आहे. प्रतिष्ठानच्या पर्यावरण पुरक कार्याचा सर्व सामाजिक संघटनेकडून गौरव करण्यात आला. यावेळी विशेष अतिथी स्वराज्य रक्षक संभाजी येसुबाई फेम अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड, प्रमुख मार्गदर्शक पाणी फाऊंडेशन डॉ. अविनाश पोळ, कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या अध्यक्षा सुंनदाताई पवार, कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा उषा राऊत, उपनगराध्यक्षा रोहिणी घुले सहाय्यक अभियंता प्रशांत वाकचौरे तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला. प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार स्वीकारण्यासाठी माजी सरपंच नीलकंठ खराडे, राजेंद्र ढोले, दादासाहेब शिंगाडे, बबन गोसावी, दिगंबर ढोले, प्रवीण साबळे उपस्थित होते.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा