भोसे दि. 4 ऑक्टोबर (प्रतिनिधी )
कर्जत तालुक्यातील भोसे गावात माजी मंत्री प्रा.आमदार राम शिंदे यांनी गाव भेट दौऱ्यादरम्यान श्री संत बाळूमामा मेंढी माऊली मंदिरास सदिच्छा भेट दिली. यावेळी आमदार राम शिंदे यांनी श्री संत बाळूमामा मेंढी माऊली समाधीचे दर्शन घेतले. तदनंतर मंदिर परीसराची पाहणी करत श्री संत बाळूमामा मेंढी माऊली प्रतिष्ठानने मंदिर परीसरात केलेल्या सुशोभीकरणाची आणि वृक्षारोपणाची सविस्तर माहिती घेत प्रतिष्ठानच्या कामाचे कौतुक केले. तसेच आमदार राम शिंदे यांनी भविष्यातील मंदिरकामाच्या जीर्णोद्धारासाठी शुभेच्छा देत लागेल ती मदत करण्याचे आश्वासन ग्रामस्थ भाविक भक्तांना दिले.
यावेळी उपस्थित मान्यवर, ग्रामस्थ आणि आमदार राम शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष शेखर खरमरे, काकासाहेब धांडे, वाल्मीकदादा साबळे, किसान मोर्चा जिल्हा अध्यक्ष सुनील काका यादव, मा.जि प.स प्रवीणदादा घुले, शांतीलाल नाना कोपनर, प्रविण तापकीर, भाऊसाहेब तापकीर, माजी सरपंच नीलकंठ खराडे,राजेंद्र ढोले, तालुका दुध संघाचे संचालक दादासाहेब खराडे, पोलीस पाटील मधुकर चव्हाण,सामाजिक कार्यकर्ते शहाजी खराडे, पांडुरंग क्षीरसागर, संतोष क्षीरसागर, प्रकाश क्षीरसागर, मोहन चव्हाण, दादासाहेब शिंगाडे, दत्तात्रय खराडे, सोमनाथ खराडे,विक्रम खराडे,प्रदीप खराडे, मयुर खराडे,किरण चव्हाण, आबा खराडे, सुभाष खराडे, गोसावी मेजर, कल्याण गोसावी, आबा पोतखुले, दिपक खराडे, विशाल खराडे, मालिदास खराडे, देवीदास क्षीरसागर, गणेश खराडे, मयुर साळुंखे,रमेश राऊत, अरूण शिंदे, योगेश ढोले, प्रमोद खराडे, समशेर शेख तसेच भोसे ग्रामस्थ भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा