गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांची प्रेरणा घेऊन वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून मुलांना शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप

जामखेड दि. 29 ऑक्टोबर (प्रतिनिधी ):- जामखेड तालुक्याचे कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकारी श्री.बाळासाहेब धनवे साहेब यांचे तालुक्यातील उलेखनिय शैक्षणिक कार्य पाहून नागोबाची वाडी येथील युवा नेते व सामाजिक कार्यकर्ते
श्री.बाळासाहेब गोपाळघरे यांनी त्यांचा मुलगा चिरंजीव जीवन याच्या वाढदिवसाचा होणारा खर्च टाळून नागोबाचीवाडी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इनामवस्ती, बारगजेवस्ती व नागोबाचीवाडी या तिन्ही शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करत तसेच मुलांना खाऊचे वाटप करून बालगोपाळा मध्ये केला वाढदिवस साजरा केला.
तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इनामवस्ती या शाळेत चि.जीवन याच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
या प्रसंगी खर्डा केंद्राचे केंद्रप्रमुख श्री.राम निकम साहेब व तिन्ही शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पालक यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
शाळेच्या वतीने मुख्याध्यापक श्री.ज्ञानेश्वर कौले सर यांनी चि. जीवन या बाळाचा सत्कार करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व सर्वांचे आभार मानले.