सहजयोग ध्यान साधना मुळेच मला हे यश गाठता आले – सोनाली काकडे सोनाली काकडे हिची तालुका कृषी अधिकारी पदी निवड झाल्या बद्दल सन्मान

नगर दि.१२ सप्टेंबर (प्रतिनिधी) – प. पु. माताजी श्री निर्मला देवी प्रणित अहमदनगर जिल्हा सहजयोग परिवाराच्या वतीने सहजयोगी युवाशक्ती सोनाली काकडे ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन तालुका कृषी अधिकारी पदी निवड झाल्या बद्दल राज्य सहजयोग समिती सदस्य अंबादास येन्नम यांचे हस्ते सहज भुवन अहमदनगर येथे सत्कार करण्यात आला, या वेळी जिल्हा समन्वयक श्रीनिवास बोज्जा, कुंडलिक ढाकणे, आबासाहेब दांगडे, चंद्रकांत रोहोकले, शांतीलाल काळे, अभय ठेंगणे, शिंदे सर, सौ. हेमाताई यादव व सौ. गीता रानडे, सौ. अलका उमाप आदी उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देतांना सोनाली काकडे म्हणाले आज माझा सन्मान ही माझ्यासाठी ऊर्जा देणारी असून मी रोज नित्य नियमाने ध्यान केल्यामुळेच ही स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन माझी तालुका कृषी अधिकारी म्हणून निवड झाली, मी श्रीमातांजीचे खूप खूप आभारी आहे. मी माझ्या पदाचा उपयोग सर्वसामान्यांसाठी करेल.
या वेळी अंबादास येन्नम व श्रीनिवास बोज्जा यांनी आपले मनोगत व्यक्त करून सोनाली काकडे हिस पुढील कार्यास शुभेच्छा दिल्यात.
कार्यक्रम चे सूत्रसंचालन कुंडलिक ढाकणे यांनी केले तर आभार शांतीलाल काळे यांनी मानले या वेळी सहजयोग परिवारातील सदस्य मोठया प्रमाणात उपस्थित होते.