चिचोंडी पाटील येथे जुगार अड्ड्यावर नगर तालुका पोलिसांचा छापा! 06 जण ताब्यांत,1लाख 76 हजार 780 रुपयाचा मुद्देमाल जप्त!

अहमदनगर (प्रतिनिधी)चिचोंडी पाटील येथे पेट्रोलिंग दरम्यान नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहा. पो. नि. राजेंद्र सानप याना डाक बंगला येथे जुगार चालू असल्याबाबत माहिती मिळाली त्यावरून छापा टाकला असता 06 आरोपी ताब्यात घेण्यात आले त्यांचेकडून जुगाराचे साहित्य,5 मोबाईल, 06मोटारसायकल व रोख रक्कम असा 1 लाख 76 हजार 780 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर प्रकरणी 1 .गिरीश महादेव कोकाटे 2.संजय रामराव शिंदे 3.गणेश सर्जेराव वाडेकर 4.नामदेव पांडुरंग खराडे,5.तात्या रामराव पवार,06.सुभाष बापूराव दानवे 07. दिगंबर पांढरे 08.रवी पवार यांचेवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियमाव्दारे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया नगर तालुका पो ठाणे स सुरू आहे.
सदरची कारवाई सपोनि राजेंद्र सानप,Asi कैलास इथापे,HC धर्मराज पालवे, रावसाहेब खेडकर,PN रमेश शिंदे, PC निलेश खिळे यांनी केलेली आहे.