महसूल मंत्री व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांचा प्रशस्तिपत्र देऊन केला सन्मान

अहमदनगर दि. १७ ऑगस्ट ( प्रतिनिधी )महसुल, पशुसंवर्धन,दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते झाले.
यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी जिल्ह्यामध्ये एकूण नऊ मर्डरच्या घटनातील उत्कृष्ट तपास करून आरोपी निष्पन्न करून आरोपींना अटक केले व पाच महिन्याच्या अल्पवधीतच जिल्ह्यामधील विविध गुन्हेगारांच्या टोळ्या गजाआड करून त्यांना प्रतिबंधक करून जिल्ह्यामधील गुन्हेगारी आटोक्यात आणली.
जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून राकेश ओला यांनी पोलीस अधीक्षकाची सूत्रे हाती घेतल्यानंतर प्रथम त्यांनी गुन्हे दाखल होण्याचे वाढवले त्यामुळे कारवाई करण्यास तात्काळ पोलिसांना पोहोचणे शक्य झाले आहे व दाखल झालेल्या गुन्ह्याचे निरंकारण अल्पवधीत करून जिल्ह्यामध्ये गुन्हेगारांना व सराईत टोळ्यांना मोकासारख्या प्रतिबंधक कारवाईचा धाक निर्माण करून पोलिसांचा दबदबा निर्माण केला व जिल्ह्यातील गुन्हेगारांना कडक शासन केल्यामुळे गुन्हेगारी आटोक्यात आली.
सध्या अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईचे कामकाज हे राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये अहमदनगरचे नाव हे प्रथम क्रमांकावर आहे.
बीड जिल्ह्याचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक म्हणून पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना यापूर्वी बीडमध्ये कार्यरत असताना त्यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे सर्वोत्कृष्ट अन्वेषण पदक या पदकाने गौरवले होते.
त्यांनी जिल्ह्याचा एलसीबीचा पदभार घेतल्यानंतर शहरातील व जिल्ह्यातील सोनसाखळी चोरांच्या टोळ्या गजाआड केल्या.जिल्ह्यातील असंख्य वाळू तस्करांच्या मुस्क्या आवळून त्यांना प्रतिबंधक कारवाई केली.
जिल्ह्यातील अवैधरित्या गांजाची झाडे लावणाऱ्या व्यक्ती विरोधात मोहीम राबवून कारवाई अशा घटनांना आळा बसवला. जिल्ह्यामध्ये गावठी कट्टे व गुटखा विक्री, काडतूस विक्री करणाऱ्या असंख्य व्यक्तीना अटक करून हद्दपारीच्या कारवाया सुरू केल्याने जिल्ह्यामध्ये गावठी कट्टे येण्यास प्रतिबंध लागला आहे. एलसीबीचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी शहरातील ओंकार उर्फ गामा भागानगरे यांचा खून झाल्यानंतर तत्काळ तपासाची सूत्रे हातामध्ये घेऊन खून करणारे आरोपीना जिल्ह्यातून व जिल्हा बाहेरून तात्काळ अटक केली.
शेवगाव शहरातील बलदवा कुटुंबातील दोघांचा खून करणाऱ्या दरोडेखोराला 24 तासात अटक करून पोलिसांची प्रतिमा अत्यंत मजबुतीने सुधारवली. व राष्ट्रवादीचा कार्यकर्ता अंकुश दत्तात्रय चत्तर खून प्रकरणातील आरोपींना राज्यातून व राज्या बाहेरून अटक केले त्यासह जिल्ह्यातील इतर असे एकूण नऊ (मर्डर) खुणातील आरोपींना अटक करून उत्कृष्ट तपास करून कौशल्य दाखवून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. याची दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या कामकाजाचा सन्मान करण्याचे ठरवले होते.
यामुळे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान केला यावेळी पोलीस अधीक्षक राकेश ओला,जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महानगरपालिकेचे आयुक्त पंकज जावळे आदी उपस्थित होते.