अहमदनगर- नागपूर येथील साळवे क्लासेसच्या वतीने आयोजित वृक्षदिंडीत विद्यार्थी विठ्ठल व रुक्मिणीच्या रूपात तसेच वारकरी म्हणून ही सहभागी झाले होते.या दिंडीच्या वेळी विद्यार्थ्यांनी विठुराया च्या गजरात लेझीम ,रिंगण, फुगडी खेळून उपस्थितांचे मनोरंजन केले.यावेळी विद्यार्थ्यांनी “नको आम्हाला गाडी बंगले, आम्हाला हवीत हिरवीगार जंगले”अशा घोषणा देऊन पालकांची समजूत काढली आहे. त्याचबरोबर “वाढदिवसाचा करू नका लाड, पण अंगणात लावा एक तरी झाड “अशी आगळीवेगळी विनंती ही समाजाला केलेली आहे .
दिंडीत क्लासच्या बालगोपाळांबरोबरच पालक व वयोवृद्ध नागरिक ही सहभागी झाले होते .दिंडी यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी साळवे क्लासेसच्या संचालिका सौ. भारती संघर्ष साळवे ,सुप्रिया बोरा , अर्पिता कांबळे, छाया महाजन आदींनी परिश्रम घेतले .तर भावेश मेडिकल च्या नाईक दांपत्यांनी विद्यार्थ्यांना अल्पोपाहार देऊन सहकार्य केले .
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा