डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या मिरवणुकीमध्ये समाजकंटकांकडून धुडगूस घालत मिरवणूक बंद करून शिवीगाळ करून मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करून अटक करण्याची समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने पोलीस अधीक्षकांना निवेदन! घटनेचा गुन्हा दाखल होऊन देखील आरोपी मोकाटच फिरत असल्याचा आरोप!

अहमदनगर (प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मिरवणूक केडगाव येथे सुरू असताना काही समाजकंटकांनी या मिरवणुकीमध्ये धुडगूस घालून समाजवासियांना जातीय वाचक शिवीगाळ करून मारहाण केली. सदरील समाजकंटकांवर कोतवली पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला असून अद्यापही त्या समाजकंटकांना अटक करण्यात आलेली नाही. तरी या घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करावी तसेच नगर तालुक्यातील शिराढोण येथे जयंतीनिमित्त भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. मिरवणूक अतिशय जल्लोषात व उत्साहात पार पडल्याचे काही समाजकंटकांना देखावले नाही व त्याचा राग धरून 16 एप्रिल रोजी बौद्ध वस्तीमध्ये काही समाजकंटकांनी येऊन समाजवासीयांना जातीवाचक शिवीगाळ केली व महिलांना धक्काबुक्की करत पुरुषांना मारहाण केली गेली. सदरील घटनेचा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल झाला नाही. या घटना अत्यंत गंभीर स्वरूपाच्या असून जातीयवाद पुन्हा मान वर काढत असून दोन्ही घटनेचा गांभीर्याने तपास करून जातीयवाद समाजकंटकांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करून त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणीसाठी समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जेष्ठ नेते अशोक गायकवाड, सुरेश भाऊ बनसोडे, अजय साळवे, अंकुश मोहिते, सिद्धार्थ आढाव, बाली बांगरे, अक्षय भिंगारदिवे, सुजन भिंगारदिवे, पवन भिंगारदिवे, निलेश शिंदे, स्वप्निल खरात, महेश भोसले,वैभव जाधव, येशुदास वाघमारे, चेतन कांबळे, सागर परदेशी, बंटी भिंगारदिवे, राहुल उमाप, सतीश शिरसाट, अतुल भिंगारदिवे, मोना विधाते, सुरेश वैरागर, गणेश गायकवाड, विशाल भिंगारदिवे, कौशल गायकवाड, समीर भिंगारदिवे, जय कदम, संदीप थोरात, आदी सह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.