रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) जामखेड तालुका युवक अध्यक्ष पदी रवि सोनवणे आगामी काळात ” गाव तेथे युवकांची शाखा उभारणार – रवि सोनवणे
जामखेड प्रतिनिधी रोहित राजगुरू
सामाजिक कार्यात सक्रिय असणारे जामखेड शहरातील महात्मा फुले नगर चे अध्यक्ष रवि राजेंद्र सोनवणे हे गेल्या १० वर्षांपासून समाज चळवळीत काम करत आहेत. समाजातील विविध प्रश्नांवर काम करताना अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहेत.डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रम राबवून समाजप्रबोधनाचे कार्य करत असतात.आंबेडकरी चळवळीत एक उमदा कार्यकर्ता म्हणून तालुक्यात ओळख आहे.याच कार्याची दखल घेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) जामखेड तालुका युवक अध्यक्ष पदी रवि राजेंद्र सोनवणे यांची
निवड करण्यात आली.यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) संस्थापक अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री (सामाजिक न्याय विभाग ) नामदार रामदास आठवले यांच्या उपस्थितीत निवडीचे पत्र देण्यात आले.
साहेबराव ससाणे (महाराष्ट्र राज्य प्रदेश सचिव),बाळासाहेब पगारे (महाराष्ट्र राज्य प्रदेश सचिव),सुनील सदाफुले (मुंबई प्रदेश उपाध्यक्ष),राजु पुजारी (महाराष्ट्र राज्य संघटक), का.मु.पवार (महाराष्ट्र राज्य बंजारा समाजाचे नेते) यांच्या मार्गदर्शनाखाली अ.नगर दक्षिण चे जिल्हा अध्यक्ष संजय भैलुमे , तालुका अध्यक्ष प्रमोद सदाफुले यांच्या नेतृत्वाखालील निवड करण्यात आली.
आगामी काळात ” गाव तेथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया
(आठवले गट) यांचे युवकांची शाखा उभारणार असा मानस नुतन युवक जामखेड तालुका अध्यक्ष रवि सोनवणे यांनी व्यक्त केला.तसेच पक्षाचे ध्येय व धोरणे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी समाजहितासाठी कार्य करण्याचे आवाहन केले आहे.रवि सोनवणे यांची निवड झाल्याबद्दल विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.