राजकिय

विश्‍वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग तिस-यांदा शपथ घेतल्‍याचा मनस्‍वी आनंद देशवासियांना आहे:पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

नगर दि.10( प्रतिनिधी)
विश्‍वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग तिस-यांदा शपथ घेतल्‍याचा मनस्‍वी आनंद देशवासियांना आहे. आत्‍मनिर्भर भारत आता विकसित करण्‍याच्‍या दृष्‍टीने त्‍यांच्‍या नेतृत्‍वाखाली सुरु झालेली तिस-या टर्मची वाटचाल ही संपूर्ण विश्‍वामध्‍ये गौरवशाली ठरेल असा विश्‍वास महसूल तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नवनिर्वाचित मंत्र्यांच्‍या शपथ विधी सोहळ्यास मंत्री विखे पाटील यांनी उपस्थित राहून त्‍यांना शुभेच्‍छा दिल्‍या. बुहेतक गावांमध्ये भर पावसातही भाजप पदाधिकरी आणि कार्यकर्त्यांनी फटाक्यांची अतिषबाजी करून या ऐतिहासिक क्षणाचा आनंद द्विगुणीत केला.सलग तिस-या वेळी पंतप्रधान पदी विराजमान होत असलेल्‍या मोदीजींनी दहा वर्षांच्‍या कारकिर्दीत देशाची प्रतिमा सर्वच पातळ्यावर उंचावली. लोककल्‍याणाच्‍या अनेक योजना तळागाळात पोहोचविल्‍या. नुकत्‍याच संपन्‍न झालेल्‍या लोकसभा निवडणूकीत पंतप्रधान मोदीजींच्‍या नेतृत्‍वाखाली पुन्‍हा एकदा भाजपा आणि एनडीएचे सरकार स्‍थापन होवून हॅट्रीक साधली गेली असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.
आयोध्‍येतील श्रीराम मंदिर, ३७० कलम या निर्णयातून राष्‍ट्रीयत्‍वाची आणि देशाच्‍या एैक्‍याची निर्णयप्रक्रीया राबवितानाच विकसित भारतासाठी वंदे भारत एक्‍सप्रेस, डिजीटल पेमेंटची सुविधा या बरोबरीनेच देशातील महिला, शेतकरी, युवावर्ग या सर्वांनाच केंद्रीभूत मानून पंतप्रधान मोदींनी सुरु केलेल्‍या योजना या सातत्‍याने लाभार्थ्‍यांपर्यंत पोहोचल्‍या. येणा-या काळात देशाची आर्थिक महासत्‍ता ५ ट्रीलियन डॉलर्स करण्‍याचे त्‍यांचे स्‍वप्‍न या तिस-या टर्ममध्‍ये निश्चित पुर्ण होईल असा विश्‍वास व्‍यक्‍त करतानाच भारत देश आता महासत्‍तेच्‍या दिशेने करीत असलेली वाटचाल लक्षात घेता पंतप्रधान मोदीजींच्‍या कर्तृत्‍वाची रेषा मोठी होत असल्‍याचा अभिमान पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि देशवासियांना असल्‍याची भावना मंत्री विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केली.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे