प्रा. डी. एस. कुंभार यांचे पी एच डी परीक्षेत यश

कर्जत( प्रतिनिधी) : दि ४ जुलै
कर्जत येथील रयत शिक्षण संस्थेचे दादा पाटील महाविद्यालयातील प्रा डॉ दिग्विजय श्रीपती कुंभार यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने नुकतीच पी एच डी (डॉक्टरेट) प्रदान केली. ते प्राणिशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी ‘स्टडीज ऑन हैड्रोबायॉलॉजि , एवीयण बायोडायव्हर्सिटी अँड हेरोनरी साईट्स ऍट उजनी रीजरवायर महाराष्ट्र ‘ या विषयावर तब्बल पाच वर्षे अभ्यास करून पुणे विद्यापीठास प्रबंध सादर केला होता. त्यास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने मान्यता देऊन दि २३ जुन रोजी पी एच डी (डॉक्टरेट) प्रदान केली. सदरच्या संशोधनासाठी प्रा कुंभार यांना प्राचार्य डॉ. डी के म्हस्के, दादा पाटील महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ बाळ कांबळे व प्र. प्राचार्य डॉ संजय नगरकर, संशोधन केंद्रप्रमुख प्रा डॉ बी ए पवार , प्राचार्य डॉ पी एम दिघे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.