निधन

कपडे धुणे बेतले जीवावर संगमनेर तालुक्यात दुर्दैवी घटना दोन बहिण भावांचा शेततळ्यात बुडून मृत्यू !

अहमदनगर (प्रतिनिधी) संगमनेर तालुक्यात शोककळा पसरली असून कपडे धुणे बहीण भावाच्या जीवावर बेतले आहे.या घटनेमध्ये बहीण भावांचा मृत्यू झाला आहे.याबाबतची सविस्तर माहिती अशी की,
संगमनेर तालुक्यातील मोधळवाडीच्या घाणेवस्ती इथं ही घटना घडली आहे. जयश्री बबन शिंदे ( वय २१ ) आणि आयुष बबन शिंदे ( वय ७ वर्ष ) असे मृत बहिण – भावाचे नाव आहे.
पिंपळगाव देपा गावांतर्गत असलेल्या मोधळवाडीतील घाणेवस्ती येथे बबन चांगदेव शिंदे हे आपल्या कुटुंबासमवेत राहातात. रविवारी सकाळी मुलगी जयश्री व मुलगा आयुष हे दोघे बहीण- भाऊ कपडे धुण्यासाठी आपल्याच शेतात असलेल्या शेततळ्यावर गेले होते. आयुष हा शेततळ्यातून पाणी काढत असताना त्याच दरम्यान त्याचा पाय घसरला. आणि तो शेततळ्यात पडला. भाऊ शेततळ्यात पडला त्यामुळे त्याला वाचवण्यासाठी बहीण जयश्री हिने मागचा पुढचा विचार न करता शेततळ्यात उडी मारली. मात्र दोघेही खोल असलेल्या शेततळ्यातील पाण्यात बुडाले. या घटनेमुळे पिंपळगाव देपा गावावर शोककळा पसरली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे