अहमदनगर दि. 9 मे (प्रतिनिधी )
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री ना.रामदास आठवले उद्या शुक्रवार दिनांक १० मे रोजी सायंकाळी अहमदनगर मध्ये महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील व सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ कोंड्यामामा चौक,मंगलगेट येथे संयुक्त सभा.रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) अहमदनगर जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांनी पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली.या सभेसाठी प्रचंड संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने करण्यात आले आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा