राजकिय

शरद पवार महाराष्‍ट्राचे मुख्‍यमंत्री होते, केंद्रातही त्‍यांना मंत्रीपद मिळाले, बारामतीच्‍या बाहेर जावून त्‍यांनी काय केले? पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

नगर, दि. 7( प्रतिनिधी) :
शरद पवार महाराष्‍ट्राचे मुख्‍यमंत्री होते, केंद्रातही त्‍यांना मंत्रीपद मिळाले, बारामतीच्‍या बाहेर जावून त्‍यांनी काय केले? असा सवाल उपस्थित करीत नगर जिल्‍ह्यात आलेले उद्योग ही पवारांची मेहेरबानी नाही. आम्‍ही काय केले यापेक्षा दाऊदच्‍या हस्‍तकांना तुम्‍ही विमानातून घेवून आलात हे देशाची जनता अजुन विसरलेली नाही अशी खरमरीत टिका महसूल, पशुसंवर्धन व दूग्‍ध व्‍यवसाय विकास मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या सभेच्‍या तयारीचा आढावा मंत्री विखे पाटील यांनी घेतला. त्‍यानंतर माध्‍यमांशी संवाद साधताना त्‍यांनी शरद पवार यांच्‍यावर निशाना साधला. शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांच्‍यावर बोलावे हेच मुळात दुर्दैव आहे. मोदीजींच्‍या सहकार्यामुळेच शरद पवारांचे राजकीय अस्तित्‍व टिकुन आहे. विखे पाटलांनी काय केले हे शरद पवारांना सांगण्‍याची गरज नाही. या जिल्‍ह्यातून आठ वेळा बाळासाहेब विखे पाटील यांना संसदेत प्रतिनिधित्‍व करण्‍याची संधी मिळाली. मलाही सात वेळा जनतेने निवडणून दिले, ही आमच्‍या कामाची पावती आहे असे स्‍पष्‍ट करुन, शरद पवार यांचे जिल्‍ह्यासाठी काय योगदान आहे हे त्‍यांनी एकदा सांगावे असे थेट आव्‍हान ना.विखे पाटील यांनी दिले.
शदर पवार यांचे कर्तृत्‍व काय हे राज्‍यातील आणि देशातील जनतेने पाहीले आहे. बारामतीच्‍या बाहेर ते काहीही करु शकलेले नाहीत. केवळ संस्‍था बळकावण्‍याचे काम त्‍यांनी केले. रयत शिक्षण संस्‍था ताब्‍यात घेवून त्‍याचा राजकीय अड्डा कसा केल्‍याची टिका मंत्री विखे पाटील यांनी केली.
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्‍यावरही मंत्री विखे पाटील यांनी निशाना साधला. थोरात वैफल्‍यग्रस्‍त झाले असून, त्‍यांच्‍या बोलण्‍याला आता कुठलाही आधार राहीलेला नाही. डॉ.सुजय विखे पाटील यांनी मागील पाच वर्षात केलेल्‍या कामांची चित्रफीत मी थोरात यांना पाठविणार असून, थोरातही अनेक वर्षे राज्‍याच्‍या मंत्रीमंडळात होते. नगरसाठी त्‍यांचे योगदान काय? मंत्री पदाच्‍या माध्‍यमातून तुम्‍ही जिल्‍ह्याला कसा फायदा करुन दिला, हे एकदा तरी सांगा. नाहीतर मी तरी महसूल मंत्रीपदाच्‍या माध्‍यमातून जिल्‍ह्यासाठी कोणते निर्णय केले हे सांगायला तयार आहे. पुर्वीप्रमाणे बदल्‍यांचे रेटकार्ड आमच्‍याकडे नाही. भारतीय जनता पक्षामध्‍ये येण्‍याची तुमची तयारी झाली होती. तुमच्‍यासाठी कोणता आमदार मध्‍यस्‍थी करीत होता हे मला माहीत आहे. तुमच्‍या भ्रष्‍ट्र कारभारामुळे दिल्‍लीतून कसा नकार मिळाला. याचे शल्‍य आता थोरात यांना असल्‍याचा टोला मंत्री विखे पाटील यांनी लगावला.
प्रकाश आंबेडकरांनी केलेल्‍या वक्‍तव्‍यावर आपली प्रतिक्रीया व्‍यक्‍त करताना अशी उथळ विधाने त्‍यांनी टाळली पाहीजेत एवढेच भाष्य मंत्री विखे पाटील यांनी केले. अमोल कोल्‍हे यांनी प्रचार सभेतून केलेल्‍या टिकेचाही त्‍यांनी समाचार घेतला. कोल्‍हेंना अजुन खुप माहीती करुन घ्‍यायची आहे. यासाठी त्‍यांना नाटकातून बाहेर याचे लागेल असेही ते म्‍हणाले.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे