धार्मिक

प्रकाशराव नगरे गुरूजींचा ८१ वा वाढदिवस धम्मपद मॉनेस्ट्रीच्या मुलांसोबत साजरा

पारनेर – (देवदत्त साळवे, तालुका प्रतिनिधी)
संपूर्ण जीवन विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी घालवलेले पारनेरचे रहिवासी असलेले
निवृत्त शिक्षक आयु.प्रकाशराव नगरे यांचा ८१ वा वाढदिवस रविवारी पारनेर येथील धम्मपद मॉनेस्ट्रीमध्ये साजरा करण्यात आला.
मुलांच्या गरजा लक्षात घेऊन गुरूजींचे चिरंजीव आयु. प्रणाम नगरे व सूनबाई आयु.कुंदाताई नगरे यांनी सर्व मुलांना ब्रॅण्डेड कंपनीचे नवीन चपलांचे जोड व स्वादिष्ट भोजन दिले.
यावेळी गुरूजींच्या सर्व परिवारासह उपस्थितांनी श्रामनेर संघाकडून त्रिसरण व पंचशील ग्रहन करून आशिर्वाद घेतले.
धम्मपद मॉनेस्ट्रीच्या अध्यक्षा आयु.ॲड.सविताताई नगरे, माजी नगराध्यक्षा आयु.वर्षा नगरे,आयु.शकुंतला नगरे, आयु.सुनिता राजाराम पवार,आयु.पोपळघट मॅडम,आयु.किशोर नगरे,आयु.निलेश विधाटे,आयु. प्रांजली विधाटे,कु.अनुज विधाटे, आयु.सुखदेव रामफळे,आयु. प्रतिभा रामफळे,आयु. प्रमिला सुर्यवंशी,आयु. मोनिका सुर्यवंशी,आयु.प्रशांत रामफळे,आयु. प्रणाली रामफळे,आयु.प्रथमेश नगरे,आयु.सिद्धी नगरे,सर्व उपासक व श्रामनेर विद्यार्थी उपस्थित होते.
पत्रकार देवदत्त साळवे यांनी नगरे गुरूजींना निरोगी दिर्घायुष्य लाभो ही सदिच्छा व्यक्त केली व उपस्थितांचे आभार मानले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे