गुन्हेगारी

एमआयडीसी मधील अपहार झालेली शेंगदाण्याची ट्रक मुददेमालासह हस्तगत, सराईत आरोपीच्या इनोव्हा कारसह ४१ लाख ३४ हजार रु किं. चा मुददेमाल हस्तगत एमआयडीसी पोलीस स्टेशनची कामगिरी

अहमदनगर दि.८ जुलै (प्रतिनिधी)
दिनांक ०४/०७/२०२३ रोजी रात्री १२/४५ वा अहमदगर एमआयडीसी येथिल प्लॉट न ए १३ येथुन आयशर ट्रक क्रं एम एच १८ बी झेड ००५४ या ट्रक मध्ये शेंगदाणा भरलेल्या २०० गोण्या प्रत्येकी ५० किलो वजनाच्या ११,३४,०००/ रु किंमतीच्या सदर माल यातील ड्रायव्हर भारत इसके रा. कालुग्राम मोरीपुरा गंधवानी थार मध्यप्रदेश याच्या ताब्यात इंदोर येथे पोहचविण्याकरीता विश्वासाने वरील किंमतीचा माल सोपविण्यात आला होता परंतु सदर माल व ट्रक संबंधित ठिकाणी पोहचला नाही म्हणुन यातील फिर्यादी हरीष ट्रेंडिंग शेंगदाणा कंपनीचे मालक कृष्णा इंदाणी रा. कराचीवाला अहमदनगर तारकपुर एस टी स्टी स्टॅंड जवळ यांनी एम आय डी सी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी वरन गु.र. नंबर ५९८ / २०२३ भादवी कलम ४०६,४०७ प्रमाणे दि.०७/०७/२०२३ रोजी दाखल करण्यात आलेला आहे.
तरी सदर गुन्हाचे गेले मालाचे व आरोपीचे तपास कामी एम आय डी सी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि राजेंद्र सानप यांनी पोलीस ठाण्याचे पोसई राजेंद्र गायकवाड, पोका / १०२४ नवनाथ दहिफळे, पोकॉ / २९४ प्रशांत धुमाळ अशाची तपास टिम बनवून मा. पोलीस अधिक्षक सो यांचे परवानणी ने सदर ची संभाजीनगर (औरंगाबाद) कडे रवाना केले. सदर टिमने संभाजीनगर येथे शेंद्रा येथे सदर गुन्हातील आयशर टेम्पो क्रं एम एच १८ बी झेड ००५४ हि बेवारस स्थितीत मिळुन आल्याने तिस पंचनामा करुन जप्त केले आहे. तसेच सदर ट्रकमधील शेंगदाणे गोण्या याचे तपास कामी जालना येथे जावुन सदर ड्रायव्हरने विकलेल्या शेंगदाणे गोण्या जालना येथील न्यू इंडीया शो रिपेअरिंग अॅन्ड बॉडी बिल्डरस या गॅरेज मधील नादुरुस्त आलेल्या ट्रकमध्ये लपवून ठेवलेल्या शेंगदाणे गोण्या एकुण ११,३४,०००/- रुपये किंमतीच्या गोण्या पंचनामा करुन हस्तगत केल्या. सदर गोण्या समीर मुन्ना शेख रा अंबड जि जालना यांने लपवुन ठेवलेलया असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सदर इसम नामे समीर मुन्ना शेख याचा शोध घेतला असता त्याचे ताब्यातील इनोव्हा गाडी क्रं एम एच ४३ एन ७३३६ या कार मध्ये पळून जातांना तपास पार्टी चे निर्दशनास आला असल्याने त्यांनी सदर बाबत अंबड पोलीस ठाण्यात कळवले असता सदरचा इसम अंबड येथे सदर कार सोडुन पळुन गेलेला आहे. सदर इनोव्हा कार मध्ये वरील चोरी गेलेल्या मालापेकी ०४ शेंगदाणा गोण्या मिळुन आल्या आहेत. समीर मुन्ना शेख जालना पोलीस स्टेशन गु.र.न. १५०/२०१८ भादवि कलम ४८९ (ए), (बी), (सी) ३४, आर्म याच्यावर यापूर्वी ता. अॅक्ट ३२५ बॉम्बे पोलीस अॅक्ट १३५ प्रमाणे गुन्हे दाखल आहेत. अशा प्रकारे सदर टिमने अवघ्या ०२ दिवसांचे आत सदर गुन्हातील एकुण चोरी गेलेला शेंगदाण्याचा माल ११,३४,०००/- रुपये, किं. १५,००,०००/- किंमतीची आयशर ट्रक व २१५,००,०००/- रुपये या इनोव्हा कार असा एकुण ४१,३४,०००/- रुपये किमतीचा मुददेमाल हस्तगत केला आहे.
सदरची कामगिरी मा. श्री. राकेश ओला सो. पोलीस अधीक्षक अहमदनगर, मा. श्री. प्रशांत खैरे सो. अपर पोलीस अधीक्षक अहमदनगर मा. श्री. संपत भोसले सो. उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि श्री. राजेंद्र सानप, सो. पोसई गायकवाड सो, पोकॉ/ १०२४ नवनाथ दहिफळे, पोका २९४ प्रशांत धुमाळ व मोबाईल सेलचे पोशि / २४३५ नितीन शिंदे मपोशि ११५४० ज्योती काळे, मपोशि/१६५६ रिंकी माढेकर यांचे पथकाने केलेली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे