चांदे बुद्रुक समृद्ध गाव योजनेचा उडला बोजवारा: नंदू नवले

कोभळी सर्कल (प्रतिनिधी) ग्रामपंचायत चांदे बुद्रुक च्या भोंगळ कारभाराला कंटाळून नागरिक त्रस्त असल्याचे दिसून येत आहे असे मत ग्रामपंचायत सदस्य नंदू नवले यांनी व्यक्त केलं. जर नले दुरुस्ती व साफ सफाई झाली नाही तर तीव्र आंदोलन करण्याच्या तयारीत आल्याचे मत मौजे चांदे बुद्रुक ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ चे मतं आहे.
गेल्या तीन-चार महीन्यापासून जनतेला पिण्याचे पाणी नाही, नदी नाले पुर्ण भरलेले असताना लोक प्रतिनीधींचा गावातील मुलभुत गरजांकडे पुर्ण दुर्लक्ष आहे. यामध्ये गावातील पिण्याचे पाणी, लाईट तसेच गावातील मुख्य रस्त्यावर गटारीचे सांड पाण्याची व्यवस्था करुन देखील, आज रस्त्यावर संपुर्ण पाणी येत आहे. गेल्या तिन महीन्यापुर्वी चांदे बु गावठान मध्ये घन कचरा व्यवस्थापन व सांडपाणी यांचे काम झाले असुन ते काम पुर्णतः निक्रुस्ट दर्जाचे झाले आहे.याबाबत त्या कामाची चौकशी साठी ग्रामपंचायत चांदे बु येथे ग्रामसभेत चर्चा होऊन सुध्दा कोणतीही कायदेशीर कारवाई झालेली नाही. तसेच दि 11/07/2022 रोजी चांदे बु दलीत वस्ती ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायत चांदे बु व ग्रामसेवक व सरपंच यांना लेखी स्वरुपात विनंती अर्ज करुन देखील त्यावर कुठलीही दखल घेतलेली नाही. त्यास पुर्णपणे तिन महीने उलटुन गेलेले आहेत.
चांदे बु सरपंच यांनी सोशल मिडीयावरती प्रसिद्धी मिळवण्यापेक्षा गावातील नागरीकांच्या समस्या कडे लक्ष द्यावे.असे चांदे बुद्रुकचे ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार मारुती नवले यांनी म्हटले आहे.