जवखेडे खालसा येथे स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती साजरी

पाथर्डी (प्रतिनिधी)
पाथर्डी तालुक्यातील निंबोडी फाटा येथील शिवलिला ग्रामीण प्रतिष्ठान संचलित स्वामी विवेकानंद व माध्यमिक विद्यालय,निंबोडी यांच्या व जवखेड खालसा ग्रामस्थांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, कार्यक्रमाचे उद्घाटक ह, भ, प, श्री बाबासाहेब महाराज मतकर,व्रुध्देश्वर वारकरी शिक्षण संस्था, कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री उद्धवराव वाघ , पोपटराव आंधळे,अमोल वाघ , ॲड, वैभव आंधळे, यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली, यावेळी विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ , महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज अशी वेषभुशा केली होती,या वेषभुषा पाहून सर्व ग्रामस्थांच्या डोळ्याचे पारणे फिटेल अशी वेषभुशा केली होती, तसेच पुर्ण गावातुन प्रभात फेरी काढण्यात आली या वेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले, लेझीम पथक, वेगवेगळी गाणी गावात स्वच्छता अभियान राबविण्यात आले, या कार्यक्रमाने विद्यार्थ्यांनी सर्वांचे मने जिंकली असा हा कार्यक्रम झाला, या कार्यक्रमासाठी सरपंच इरफान पठाण, तुषार वाघ,शरद गवळी, बबन तात्या नेहुल, सुरेश आंधळे, बाबासाहेब मतकर, हरिभाऊ जाधव,व ,अदिनी खुप छान सहकार्य केले या सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका मनिषा पालवे यांनी खुप परिस्रम घेतले तसेच सर्व शिक्षकव शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे योगदान दिले, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पारवेकर मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन मनिषा म्हस्के,व़ विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष श्री अंकुश पालवे सरांनी मानले.