दगडवाडी येथील शालेय विद्यार्थी आणि ग्रामस्थांना रस्त्यापाई करावे लागती काट्याची कसरत…

(कौडाणे प्रतिनिधी -संभाजी शिंगाडे) कौडाणे येथील दगडवाडी ते चांदा हा रोड दळणवळणाच्या दृष्टीने व शालेय विद्यार्थ्यांच्या शाळेत जाण्याचा अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे परंतु रोड वरती भरपूर प्रमाणात मोठे खड्डे व पाणी साचले आहे यामुळे विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना बांधावरून मार्ग काढत जावे लागते. यामुळे हा रोड शालेय विद्यार्थी आणि ग्रामस्थांसाठी धोकादायक असून प्रशासनाने लक्ष द्यावे.अशी मागणी येथील ग्रामस्थ नितीन गंगावणे राहुल गंगावणे प्रकाश गंगावणे बाळू सूर्यवंशी भाऊसाहेब गंगावणे प्रमोद गंगावणे भाऊसाहेब शिंगाडे महादेव शिंगाडे आकाश जगदने निखिल सूर्यवंशी स्वप्निल गंगावणे विजय शिंगाडे यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला केली आहे.
प्रतिक्रिया:
दळणवळणाच्या दृष्टीने दगडवाडी ते चांदा हा रोड शालेय विद्यार्थी आणि ग्रामस्थांसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याने काही अनुचित प्रकार घडण्याच्या अगोदर प्रशासनाने लक्ष द्यावे.
बाळू शिवराम सूर्यवंशी शेतकरी
न्यू इंग्लिश स्कूल चांदे बुद्रुक या ठिकाणी शाळेत जाण्यासाठी प्रमुख मार्ग आहे या मार्गावरती खूप मोठ्या प्रमाणावर पाणी आणि खड्डे झाले आहेत तरी जाण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागतो. विद्यार्थिनी – धनश्री नितीन गंगावणे.