राजकिय
अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांना केले पराभूत! लंकेच्या विजयाची तुतारी वाजली!

अहमदनगर दि. 4 जून (प्रतिनिधी ) संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके व महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्यात प्रमुख लढत होती. ही लढाई अत्यंत वेधक ठरली. मात्र या लढाईत महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांना धूळ चारत विखे यांना पराभूत केले. 29 हजारांच्या मताने निलेश लंके विजयी निवडून आले असून लंकेच्या विजयाची तुतारी वाजली. धनशक्तीला जनशक्तीने अखेर घरी पाठविले असल्याच्या चर्चा नागरिकांमधून व्यक्त होत आहेत.