तांभेरेतील दलितत महिलांचे तहसीलदारांना साकडे!

राहुरी दि.२४ (प्रतिनिधी)
राहुरी तालूक्यातील तांभेरे गाव गेल्या चार दिवसांपासून बंद ठेवण्यात आले. तांभरे गावामध्ये घडत असलेल्या जातीयवादी कारवाया बाबत आज तांभेरे येथील ग्रामस्थांनी एकत्र येत तहसीलदार यांना निवेदन दिले आहे. सदर जातीयवादी व समाज कंटक लोकांवर कारवाई करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली.
तहसीलदार फसिओद्दीन शेख यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, राहुरी तालुक्यातील तांभेरे येथे १४ मार्च पासून आजपर्यंत घडत असलेल्या कारवाया बाबत प्रशासनाला पूर्व कल्पना आहे. दिनांक १९ मार्च पासून तांभेरे गावातील काही जातीयविरोधी व संविधान विरोधी समाज कंटकांनी गाव बंद केले आहे. जोपर्यंत गावातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा निळा स्तंभ काढणार नाहीत, तोपर्यंत गाव विना परवानगी बंद ठेवणार आहोत, असे त्यांनी ठरविले आहे.
तांभेरे गावात अनेक जातीधर्माचे लोक एकत्र राहतात. त्यातील मागासवर्गीयांना विशेष प्रतिबंध केला आहे त्यामध्ये त्यांच्या अत्यावश्यक सेवा किराणा दुकान, मेडिकल व दुध विक्री दुकाने बंद ठेवली आहेत. तसेच गावातील यात्रा उत्सवामधून सर्व दलित बंधू भगिनी व वाजंत्री यांना प्रतिबंध केला आहे शेतामध्ये काम करणाऱ्या मजूरांना कामावर येणे बंद केले. त्याचप्रमाणेच तांबे वस्तीवरील ग्रामपंचायत मार्फत होणारा पाणीपुरवठा अनेक वर्षापासून विविध कारणे सांगून बंद केला आहे गावातील ग्रामस्थांना काही समाज कंटकांनी मागसवर्गीय लोकांना मदत केल्यास त्याचे परिणाम वाईट होतील अशा धमक्या दिल्या जात आहेत. त्यामुळे तांभेरे गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अमोल गागरे, उमेश मुसमाडे, सुधाकर मुसमाडे, किशोर गागरे, राजेंद्र कोते, सचिन भिंगारे, संतोष पवार, संदीप मुसमाडे, विजय मुसमाडे, विलास मुसमाडे, दादासाहेब गागरे, राजेंद्र गागरे, चंदन मुसमाडे, सतिष मुसमाडे, कैलास गागरे, सिद्धार्थ मुसमाडे, बापूसाहेब मुसमाडे, आदि समाज कंटक गावामध्ये ठिक ठिकाणी बैठका घेऊन डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उभारलेला स्तंभ कसा काढता येईल, याचा विचार करत आहेत. तसेच इतर ग्रामस्थांना चिथावणी देत आहेत. असे निवेदनात म्हटले आहे. दिलेल्या निवेदनावर तांभेरे येथील शेकडो ग्रामस्थांच्या सह्या आहेत.