संगमनेर येथील कंपनीमधुन कॉपर वायरची चोरी करणारे आरोपी मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद

अहमदनगर दि. 18 डिसेंबर (प्रतिनिधी )
प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, फिर्यादी
विश्वजीत वसंतराव कुलकर्णी वय 55 वर्षे, रा. मालपाणीनगर, घुलेवाडी, संगमनेर, ता. संगमनेर यांचे गुंजाळवाडी शिवारातील प्रथमेश ऐश्वर्या ट्रान्स फॉमर्स नावाचे कंपनीमधुन अनोळखी आरोपींनी 1,07,076/- रुपये किमतीचे कॉपर वायर बंडल, ऍ़ल्युमिनीअम वायर बंडल चोरुन नेलेले होते. सदर घटनेबाबत संगमनेर शहर पोलीस स्टेशन गु.र.नं. 1016/2023 भादवि कलम 380 प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना मालाविरुध्दचे गुन्हे उघडकीस आणणेकरीता विशेष पथक नेमुण कारवाई करणे बाबत आदेश दिले होते.
नमुद आदेशान्वये पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोउपनि/तुषार धाकराव, पोना/रविंद्र कर्डीले, पोना/फुरकान शेख, पोकॉ/रणजित जाधव, पोकॉ/शिवाजी ढाकणे, पोकॉ/अमृत आढाव, मेघराज कोल्हे, चापोहेकॉ/संभाजी कोतकर अशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमुन मालाविरुध्दचे ना उघड गुन्हे उघडकीस आणणेकरीता मार्गदर्शन करुन पथकास तात्काळ रवाना केले. पोलीस पथक दिनांक 17/12/23 रोजी संगमनेर शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये घटनाठिकाणचे तसेच परिसरातील सी. सी. टी. व्ही. फुटेज पाहुन तसेच तांत्रिक विश्लेषण व गोपनिय बातमीदारामार्फत आरोपीची माहिती काढत असतांना पोनि/श्री. दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, वर नमुद गुन्हा हा संदीप उर्फ जब्या संजय वाल्हेकर रा. संगमनेर याने व त्याचे इतर साथीदारांनी केला असुन ते घुलेवाडी या ठिकाणी बसलेले असलेबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास देवुन खात्री करुन कारवाई करणे बाबत कळविल्याने पथकाने लागलीच घुलेवाडी या ठिकाणी जावुन बातमीतील दोन संशयीत इसम मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेवुन त्यांचे नांव गांव विचारता त्यांनी त्यांची नावे 1) संदीप उर्फ जब्या संजय वाल्हेकर वय 24 वर्षे, रा. आठरा पगड जाती, वेल्हाळे रोड, संगमनेर, ता. संगमनेर व 2) निखील उर्फ अजय विजय वाल्हेकर वय 19 वर्षे, रा. सदर असे असल्याचे सांगितले. त्यांना विश्वासात घेवुन वर नमुद गुन्ह्याबाबत त्यांचेकडे सखोल विचारपुस करता त्यांनी त्यांची साथीदार नामे 3) सागर बाळु गायकवाड रा. साठेनगर, घुलेवाडी, संगमनेर (फरार), 4) अक्षय सावन तामचीकर रा. भाटनगर, घुलेवाडी, संगमनेर (फरार), 5) हर्ष उर्फ चिक्या अशोक वाकचौरे, रा. घुलेवाडी, संगमनेर (फरार) यांचेसह गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींकडे गुन्ह्यातील मुद्देमालाबाबत विचारपुस करता त्यांनी चोरी केलेल्या कॉपर वायरचे बंडल जाळुन त्यातुन कॉपरची तार काढलेली असल्याचे सांगुन 36,500/- रुपये किमतीची 50 किलो कॉपरची तार काढुन दिल्याने ती तपासकामी जप्त करण्यात आलेली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींना मुद्देमालासह पुढील तपासकामी संगमनेर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी हजर करण्यात आले असुन पुढील तपास संगमनेर शहर पोलीस स्टेशन करीत आहे.
आरोपी संदीप उर्फ जब्या संजय वाल्हेकर हा रेकॉर्ड वरील आरोपी असुन त्याचेविरुध्द अहमदनगर जिल्ह्यामध्ये चोरी व घरफोडीचे खालील प्रमाणे 8 गुन्हे दाखल आहेत.
अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1. संगमनेर शहर 1963/2020 भादवि कलम 454, 457, 380
2. संगमनेर शहर 131/2021 भादवि कलम 457, 380