कर्जत एसटी महामंडळ यांचे वेळापत्रक ढासळले विद्यार्थ्यांची व प्रवाशांची गैरसोय! भारतीय जनता पार्टी तालुका शहर विद्यार्थी आघाडीच्या वतीने निवेदन!

कर्जत (प्रतिनिधी ) दि 27 सप्टेंबर कर्जत तालुका एसटी महामंडळ यांचे वेळापत्रका प्रमाणे गाडी सुटत नसल्याने विद्यार्थ्यांची कोळंब होत आहे तरी भारतीय जनता पार्टी तालुका शहर विद्यार्थी आघाडी मार्फत आज निवेदन देण्यात आले या निवेदनात असे म्हटले आहे की कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागातून शिक्षणासाठी मुले कर्जत तालुक्यातील विद्यालय मध्ये येतात परंतु एसटी च्या वेळापत्रकामध्ये अनुकूलता नसल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे विद्यार्थ्यांना कुचुंबना सहन करावी लागत आहे आपल्या आगारामध्ये कोणतेही उत्तरदाई राहिले नाही त्यामुळे विद्यार्थ्यां सुविधाविषय किंवा अडचणीविषय कोणाशी संपर्क करा असा प्रश्न निर्माण झालं आहे असे या निवेदनात म्हंटले आहे हे निवेदन कर्जत आगार व्यवस्थापक या ठिकाणी देण्यात आले यावेळी उपस्थित रोहित ढेरे विद्यार्थी आघाडी तालुका शहर उपाध्यक्ष तालुका सरचिटणीस शेखर खरमरे युवा नेते वाल्मीक दादा साबळे तालुका उपाध्यक्ष भाऊसाहेब गावडे नगलवाडी उपसरपंच कैलास कापरे संभाजी गोसावी संभाजी शिंगाडे युवा मोर्चा प्रसिद्धी प्रमुख हानु गावडे आदी उपस्थित होते.