ख्रिश्चन समाजावर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनेची गंभीर दखल घेणे गरजेचे:प्रकाश आंबेडकर

अहमदनगर दि. 21 फेब्रुवारी (प्रतिनिधी )
सोनई येथे पास्टर सुनिल गंगावणे यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यासंदर्भात जिल्हा पोलिस अधीक्षक श्री राकेश ओला यांची भेट घेण्यासाठी आज वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर आले होते . घटनेची माहिती जिल्हाध्यक्ष प्रतिक बारसे यांनी दिली त्याप्रमाणे आज मा. प्रकाश आंबेडकर साहेबांनी पास्टर सुनिल गंगावणे यांच्या पत्नी शैलजासिस्टर व त्यांच्या मुलाची भेट घेतली. यावेळी वंचित बहुजन आघाडी चे राज्य उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण व दिशा पिंकी शेख, जिल्हाध्यक्ष प्रतिक बारसे , शहर अध्यक्ष हनिफ शेख , शहर महासचिव अमर निरभवणे, आदींनी पोलिस अधीक्षक साहेबांची भेट घेतली व चर्चा केली. यावेळी योग्य तपास करुन दोषी वर कडक करवाई करावी. पण दोषी नसल्यास गुन्ह्यातून वगळावे अशा सूचना आंबेडकर साहेबांनी केल्या. यावेळी ख्रिश्चन समाजातील युवक कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थिती होते सर्वांनी संकटात आधार दिल्याबद्दल प्रकाश आंबेडकर साहेबांचे आभार मानले.