पाथर्डी, शहरातील इंदिरा गांधी चौक ते चिंचपुर रस्ता दुरुस्त न झाल्यास कॉंग्रेस कमिटीच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा

पाथर्डी दि.११(प्रतिनिधी)
पाथर्डी शहरातील इंदिरा गांधी चौक ते चिंचपूर रोड रस्ता दुरुस्ती न झाल्यास बेमुदत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देऊन तातडीने हा रस्ता दुरुस्त करावा अशा मागणीचे निवेदन पाथर्डी तालुका काँग्रेस पक्षाचे वतीने पाथर्डी नगर परिषद मुख्याधिकारी यांना देण्यात आले. पाथर्डी शहरातील मध्यवर्ती भागातील असलेल्या इंदिरा गांधी चौक ते चिंचपूर रोड रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली असून ठिकाणी पविंग ब्लॉक रोड उध्वस्त झाला असून रस्त्याच्या खालून गटारीचे पाणी पाझरत असून चालणाऱ्या नागरिकांच्या अंगावर गटारीचे पाणी उडत असून या रस्त्यावर रस्त्यावर पसरलेल्या दुर्गंधीमुळे नागरिकांना गैरसोयीचा प्रचंड सामना करावा लागत आहे. आरोग्याची व्यवस्था बिकट असून डेंग्यूची साथ बळावत आहे, वारंवार पालिका प्रशासनाला लेखी तोंडी निवेदन देऊन देखील त्यावर उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत सदर परिस्थितीमुळे नागरिकांच्या व रहिवाशांच्या संयमाचा बांध आता तुटलेला आहे ,म्हणून पाथर्डी तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष श्री नासिर शहानवाज शेख यांच्या नेतृत्वाखाली सर्व नागरिक व बहुसंख्य काँग्रेस पदाधिकारी यांनी आंदोलन करून नगरपरिषद मुख्याधिकारी यांना निवेदन दिले व लवकरात लवकर दुरुस्ती न झाल्यास हीच पूर्वसूचना समजून बेमुदत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे यावेळी जिल्हा काँग्रेस सरचिटणीस प्राध्यापक जालिंदर काटे सर, सेवादल काँग्रेस तालुकाध्यक्ष किशोर डांगे सर, जिल्हा काँग्रेस प्रतिनिधी नवाबभाई शेख, तालुका काँग्रेस अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष गणेश दिनकर ,युवक काँग्रेस तालुका उपाध्यक्ष गणेश जुनेद भाई पठाण, सामाजिक कार्यकर्ते परवेज पठाण, तालुका संघटक सचिन राजळे, अल्पसंख्याक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष मुन्नाभाई खलिफा, काँग्रेस नेते अशोकराव ढाकणे, सामाजिक कार्यकर्ते बब्बू भाई बेकरी वाले , अर्षद पठाण, तालुका काँग्रेस तालुका काँग्रेस उपाध्यक्ष वसंतराव खेडकर ,शहर युवक काँग्रेस उपाध्यक्ष महेश भैय्या दौंड, अल्पसंख्यांक काँग्रेसचा उपाध्यक्ष जब्बार भाई आतार, अल्पसंख्यांक काँग्रेस तालुका उपाध्यक्ष युसुफ खान ,तालुका काँग्रेस सरचिटणीस सुभाष पाटील कोलते ,चींचपुर इजदे काँग्रेस अध्यक्ष बबनराव खेडकर, आदींसह अनेक मान्यवर आणि काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.