गुन्हेगारी

विनापरवाना वाळू वाहतूक करताना दोन वाहने महसुल पथकाच्या ताब्यात

कर्जत (प्रतिनिधी) : दि १९ मे
राशीन आणि घुमरी (ता.कर्जत) येथे अवैध विनापरवाना वाळू वाहतूक करताना दोन वाहने कर्जत महसुल पथकाने ताब्यात घेतले असून सदरची वाहने दंडात्मक कारवाईसाठी तहसील कार्यलयात जमा केले असल्याची माहिती तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी दिली. घुमरी येथे आणखी एक वाहन पळून नेण्यात वाळूतस्कर यशस्वी ठरले मात्र त्या संबंधित चालक आणि मालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
मंगळवार, दि १७ रोजी तहसीलदार नानासाहेब आगळे यांना सीना आणि भीमानदीतून अवैध वाळू उपसा करून त्याची वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाली. तहसीलदार आगळे यांनी तात्काळ दोन पथके तयार करून दोन्ही नदी पात्रात रवाना केले. यावेळी सदर पथकास घुमरी येथे दोन वाहने वाळू वाहतूक करताना आढळून आली मात्र एक वाहन ताब्यात घेत असताना दुसऱ्या वाहन चालकाने वाळू भरलेल्या वाहनासह पोबारा केला. यातील एक वाहन तहसील कार्यलयात आणून जमा करण्यात आला असून त्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तर पळून गेलेल्या वाहन चालक आणि संबंधित मालकावर रीतसर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात येईल अशी माहिती तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी दिली आहे. यासह दुसऱ्या पथकाने रात्री भीमानदी पात्रातून अवैध आणि विनापरवाना वाळू वाहतुक करताना वाहन ताब्यात घेतले. ते वाहन देखील दंडात्मक कारवाईसाठी कर्जत तहसील कार्यलयाच्या आवारात आणून जमा केला. सदरची कारवाई प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार नानासाहेब आगळे, नायब तहसीलदार प्रकाश बुरुंगले, मंडळ अधिकारी परमेश्वर पाचारणे, तलाठी आनंद कोकाटे, विकास सोनवने, धुलाजी केसकर, प्रशांत गोंडचर, जितेंद्र गाढवे, पोलीस कर्मचारी मनोज लातूरकर यांनी पार पाडली.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे