अहमदनगर दि.15 जानेवारी (महेश भोसले ) नवीन वर्षातला अत्यंत महत्वाचा व पहिला सण अर्थातच मकरसंक्रात! महाराष्ट्रात हा सण एकमेकांना तिळगुळ देत घरात पुरण पोळी करून आनंदी वातावरणात साजरा केला जातो. तसेच महिला देवाला पूजन्यासाठी पैठणी, नथ व विविध सोन्याचे दागिने घालून मंदिरात जात असतात.
नगर शहरात सकाळी नऊ वाजल्यापासुनच लहान मुले व तरुणाई मोकळ्या मैदानावर,इमारतीवर जाऊन ओय कापे!……… ओय खल्लास!….स्स म्हणत ‘जिसे देख मेरा दिल धडका ‘, ‘उडी उडी जाये दिल कि पतंग, ‘ ‘आरे रास्ता रास्ता देखो आंख मेरी लडी है ‘,
‘अश्विनी येना.. येना… प्रिये’…..’मैं निकला गड्डी लेके’, ‘ पिले पिले ओ मोरे जानी, पिले पिले ओ मोरे राजा ‘ अशा डीजे च्या गाण्यावर आज दिवसभर तरुणाई दिवसभर पतंगबाजीचा मनमुराद आनंद घेत असल्याचे चित्र दिसून आले.याच बरोबर लोकसभेच्या निवडणुकीची राजकीय पतंगबाजी लवकरच दिसणार असल्याच्या चर्चा देखील नागरिकांमधून होत आहेत.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा