नॅशनल गेम्स स्पर्धेत पोलिस हवालदार अर्चना काळे यांनी मेडल मिळवून खात्याची मान उंचावली

अहमदनगर/प्रतिनिधी नॅशनल गेम्स स्पर्धेमध्ये पोलिस हेड कॉन्स्टेबल अर्चना काळे यांनी विविध पदक मिळवून पोलिस खात्याची मान उंचावली आहे.. या अगोदर ही त्यांनी विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन पदक मिळवून दिले आहे. नुकत्याच ” नाशिक येथे झालेल्या दि.२४ ते २७ नोव्हेंबर २०२२ रोजी दरम्यान नैशनल मार्टस वेट रन स्पर्धेत नगर जिल्ह्यातील पोलिस हवालदार अन्वरअली सय्यद यांनी अनुक्रमे लांबउडी स्पर्धेत द्वितीय क्रमांक रौप्य पदक ( seliver meddal ) रौप्य ब्राँग पदक ( Seliver Brong middal ).रिले
4X100 तृतीय क्रमांक मिळवून पोलीस खात्याचे नाव उंचावले. तसेच महिला पोलिस हवालदार अर्चना रामभाऊ काळे यांनी १०० मिटर स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळविला नुकत्याच चंद्रपुर येथे झालेल्या पॉवरलिफ्टिंटंग स्पर्धेत नॅशनल गेम्स मध्ये महाराष्ट्राचे नेतृत्व करित ५७ किलो वजनगटात १८० किलो वजन उचलून तृतीय क्रमांक काश्य पदक मिळवले आहे.
त्याच बरोबर पोलिस हवालदार अर्चना काळे यांनी अहमदनगर जिल्हा पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत सहभागी होऊन ५७ किलो वजनगटाल 180 किलो वजन उचलून प्रथमक्रमांक मिळवून ( Gold middela ) सुवर्ण पदक मिळवले आहे. त्यांच्या या यशाबद्दल पोलिस अधीक्षक राकेश ओला अहमदनगर यांनी त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. नॅशनल गेम्स स्पर्धेत यश संपादन केल्याबद्दल या सर्व खेळाडुंचे संपुर्ण पोलिस दलातुन अभिनंदन होत आहे.