जिल्हा रुग्णालयातील रुग्णांना नियमित दिले जाते दर्जेदार जेवण

अहमदनगर दि.20 ऑक्टोबर (प्रतिनिधी )जिल्हा शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल हे चांगली आरोग्यसेवा, चांगली स्वछता यामुळे तर चर्चेत आहेच, पण याही पलीकडे एक अत्यंत महत्वाची बाब आमच्या लक्षात आली आहे. ती म्हणजे जिल्हा रुग्णालय मध्ये जे रुग्ण ऍडमिट आहेत त्या प्रत्येक कक्षातील रुग्णांना नियमित व दर्जेदार जेवण दिले जात आहे.तसेच प्रसूती कक्षातील महिलांना नियमित जेवणाबरोबरच अंडी व गूळ शेंगदाणा घालून केलेले लाडू दिले जात असल्याची सकारात्मक माहिती आहार विभागास भेट दिली असता आमच्या समोर आली आहे.
आहार विभागात जेवण बनविण्याच्या खोलीमध्ये अत्यंत स्वछता राखली जाते आहे. आहार बनविण्याची प्रक्रिया उत्तम असून कर्मचारी वर्गात असलेला टापटीपपणा देखील महत्वाचा आहे. आहारामध्ये वापरला जाणारा किराणा आय. एस. आय. मार्किंगचा असल्याचे आढळून आले आहे. एकंदरीतच जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या नागरिकांना व रुग्णांना येथे दिली जाणारी उत्तम आरोग्यसेवा, उत्तम स्वछता व सर्वोत्तम नियमित दिले जाणारे दर्जेदार जेवण यामुळे नागरिक व ऍडमिट असलेल्या रुग्णांमध्ये समाधान असल्याचे चित्र आहे.
प्रतिक्रिया :
प्रसूती कक्षातील प्रतीक्षा मोकाटे यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी रुग्णालयात नियमित व चांगल्या दर्जाचे जेवण मिळते तसेच दूध, अंडी, लाडू इत्यादी रोज दिले जाते.