छावा संघटनेच्या वतीने खासदार विखे यांना निवेदन शारदीय नवरात्र उत्सव निमित्त नॅशनल हायवेचे कौडगाव ते करंजी व तीसगाव महामार्गावरील खड्डे बुजवण्याची मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी)- कल्याण विशाखापट्टणम नॅशनल हायवे चे कौडगाव, करंजीगाव ते तीसगाव या भागात महामार्गावर मोठ्या प्रमाणात खडडे पडले असुन त्यामुळे गाडी चालवणे देखील अवघड झाले असुन येथिल खडडे चुकविण्याच्या नादात अनेकदा गंभीर अपघात झालेले आहेत. त्यामूळे शारदीय नवरात्र उत्सव सुरू होत असल्यामुळे या रस्त्यावर दिवसा व रात्री संपुर्ण महाराष्ट्रातील भक्त मंडळी मोहटा देवीच्या दर्शनासाठी दररोज पायी व गाडीवर भावीक मोठया संखेने या मार्गाने येजा करत असतात. त्यामूळे येथे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी लवकरात लवकर सदरील रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात यावे या मागणीसाठी छावा संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय व खासदार सुजय विखे यांना निवेदन देताना छावा संघटनेच्या महिला जिल्हाअध्यक्ष सुरेखाताई सांगळे, पश्चिम महाराष्ट्र युवक सचिव दत्ताभाऊ वामन, संतोष दगडखैर, संदीप बोरुडे, सौरभ गाडे, भैय्या गाडे, सचिन वाघ, राहुल भांबरकर, शोभा तोडमल, मीनाक्षी जाधव आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.