न्यायालयीन
निर्मळ पिंपरी येथील दलित कुटुंबिय अत्याचार प्रकरणी आरोपींना चार दिवस पोलीस कोठडी

राहाता दि.9 डिसेंबर (प्रतिनिधी): राहता तालुक्यातील निर्मळ पिंपरी येथील दलित कुटुंबावर अत्याचार प्रकरणी दिनांक 07/12/ 2023 रोजी 71 आरोपींविरुद्ध फिर्यादी -शारदा सुधाकर कोळगे यांचे फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला होता. त्यातील मुख्य तीन आरोपी यांना अटक करून आज रोजी मा. सत्र न्यायालयात हजर केले असता सदर आरोपी 1) विकास बाळकृष्ण निर्मळ वय-47 रा. पिंप्री निर्मळ2) सोपान कारभारी निर्मळ वय- 58 रा. पिंप्री निर्मळ 3) मयूर भिमराज निर्मळ वय-27 रा.पिंप्री निर्मळ यांना मा. न्यायालयाने दि.13/12/2023 पर्यंत 4 दिवस पोलिस कस्टडी रिमांड दिली आहे. तसेच सरकारच्या वतीने सरकारी वकील ॲड. वहाडणे आणि dysp संदीप मिटके यांनी तर आरोपी यांचे वतीने ॲड. जयंत जोशी यांनी काम पाहिले.