राजकारणाच्या जडणघडणीत आरोप प्रत्यारोप होतच असतात:खा.सुजय विखे

राहुरी दि.१८ जानेवारी (प्रतिनिधी)
राजकारणाच्या जडणघडणीत आरोप प्रत्यारोप होतच असतात:
परंतू त्या आरोप प्रत्यारोपांचा योग्य अंदाज घेऊनच आपल्या वर्तमानपत्रांतून त्याची दखल घेतली पाहिजे.राहुरी तालुक्यातील पत्रकारांचे लिखाण नेहमीच सत्याला धरून राहीलेले आहे.वाक्य आणि विश्लेषण हे योग्य रीत्या आपल्या बातमीतून मांडता आले पाहिजेत, जेणेकरून समज गैरसमज होत नाहीत.पत्रकारीतेचे विवीध पैलू आता जगासमोर आले आहेत.प्रिंट मीडीया, इलेक्ट्रॉनिक्स मिडीया,तसेच आता वेबपोर्टल आधुनिकते मधे बघावयास मिळतात.अजूनही आपली बातमी वर्तमानपत्रात झळकल्या शिवाय जागृत लोकांना हायसे वाटत नाही.असे मत अहमदनगर दक्षिण चे विद्यमान खासदार डॉ सूजयदादा विखे पाटील यांनी पत्रकारांच्या सत्कार प्रसंगी आपल्या मनोगतात व्यक्त केले.दैनिक मराठवाडा साथी, राहुरीचे बातमीदार राजेंद्र साळवे यांचा डॉ.सुजय दादा विखे पाटील यांनी सत्कार केला.राहुरी तालुक्यातील मूळा धरण येथे शासकीय विश्रामगृहात पत्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रकारांच्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते.यावेळी जेष्ठ नेते सभाष पाटील,माजी आमदार शिवाजीराव कर्डिले, डॉ तनपूरे चे अध्यक्ष नामदेव ढोकणे,तानाजी धसाळ, शामराव निमसे, साईनाथ कोळसे,शिवाजी डौले, दत्तात्रय ढूस,सुरसिंग पवार, ज्ञानेश्वर विखे, गणेश खैरे, सुभाष गायकवाड,अमोल भणगडे, महेश पाटील,तसेच कारखान्याचे संचालक उपस्थित होते.
यावेळी शिवाजीराव कर्डिले म्हणाले की,सोशल मीडियावर आलेली बातमी लवकर समजते, परंतु त्या बातमीचे देखील अवलोकन झाले पाहिजे, जेणेकरून खरी माहिती लोकांना समजेल.पत्रकारांनी राजकीय बदलावर लिहीताना सामाजिक प्रश्न देखील तितकेच ताकदीने आपल्या लिखाणातून मांडले पाहिजे, जेणेकरून ते लोकप्रतीनीधींना लक्षात येतील.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन सुभाष गायकवाड यांनी मानले.