शिर्डी येथील सुगंधी तंबाखु व पानमसाला अवैधरित्या विक्री करण्याच्या उद्देशाने कब्जात बाळगणारा आरोपीस 127461/- रुपये किंमतीच्या मुद्देमालासह जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद

अहमदनगर दि. 2 डिसेंबर (प्रतिनिधी )
मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांचे मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोसई/तुषार धाकराव, पोहेकॉ/मनोहर गोसावी, पोना/संदीप चव्हाण, गणेश भिंगारदे, पोकॉ/अमृत आढाव व चापोहेकॉ/संभाजी कोतकर यांचे पथक नेमून महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधीत असलेला गुटखा व पानमसाला विरुध्द कारवाई करणेबाबत आदेश दिले होते. नमुद आदेशान्वये पथक माहिती घेताना दिनांक 01/12/2023 रोजी पोनि/श्री. दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, इसम 1) साजीद पठाण व 2) आबीदखान पठाण रा. नुराणी मज्जीद जवळ, श्रीराम नगर, शिर्डी हे त्यांचे राहते घराचे तळ मजल्याचे खोलीत सुगंधीत तंबाखु व पानमसाला विक्री करण्याचे उद्देशाने कब्जात बाळगुन आहे आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास कळवुन, पंचाना सोबत घेवुन खात्री करुन कारवाई करणे बाबत सुचना दिल्या.
पथकाने दिनांक 01/12/23 रोजी बातमीतील नमुद ठिकाणी जावुन पाहणी करता एक संशयीत इसम गोण्या मधुन पुडे काढताना दिसला पथकाची खात्री होताच 17.00 वा. चे सुमारास अचानक छापा घालुन एका संशयीतास ताब्यात घेतले. त्यास पोलीस पथकाची ओळख सांगुन त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव 1) साजीद साहेबखान पठाण वय 32, रा. नुराणी मज्जीद जवळ, श्रीराम नगर, शिर्डी असे सांगितले. संशयीत इसम उभा असलेल्या तळ घराची झडती घेता त्यामध्ये विविध प्रकारची सुगंधी तंबाखु व गुटखा पानमसाला मिळुन आला. त्या बाबत विचारपुस करता आरोपीने सदर माल हा त्याचा भाऊ नामे 2) आबीदखान साहेबखान पठाण रा. नुराणी मज्जीद जवळ, श्रीराम नगर, शिर्डी (फरार) याने आणला असुन दोघे मिळुन विक्री करतो अशी माहिती दिल्याने आरोपीस महाराष्ट्र राज्यात विक्री व वाहतुकीस प्रतिबंधीत असलेला गुटखा, पानमसाला व तंबाखुजन्य पदार्थ असा एकुण 1,27,461/- रुपये किंमतीचे मुद्देमालासह ताब्यात घेवुन शिर्डी पो.स्टे.गु.र.नं. 1067/23 भादविक 328, 188, 272, 273 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शिर्डी पोलीस स्टेशन करीत आहे.
सदर कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्रीमती. स्वाती भोर मॅडम, अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपूर, मा. श्री. संदीप मिटके साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, शिर्डी विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.